नागरी आघाडीचा टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील दहा हजाराच्या आसपास लोकसंख्या असणार्या पिलीव गावाला निरा उजवा कालवा उशाला असल्याने पाण्याची कधीच टंचाई भासली नव्हती.परंतु यावर्षी पहिल्यांदाच तीव्र पाणी टंचाई भासवली असल्याने गावाला पाणी देणे हे आपले कर्तव्य असल्याचे समजून पिलीव गावातील नागरी अघाडीच्या पदाधिकार्यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे लोकांना मोफत पाणी पुरवठा सुरु केला आहे.काल शनिवार दिनांक 6 जुलै रोजी मारुती मंदीरासमोर माजी सरपंच संग्राम पाटील,अरीफखान पठाण,डॉ.मिलींद गुळभिले,अमोल मदने,नानासाहेब देशमुख,राजेंद्रसिंग जामदार,कुमार भैस,मोहन करांडे,राहुल मदने,दत्तुसिंग भैस,जिवन गुरव,कुमार लोखंडे यांच्या हस्ते टँकरचे पुजन करुन मोफत पाणी वाटपास सुरवात केली.यावेळी गावकर्यांकडून समाधान व्यक्त होत असल्याचे पहावयास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *