दिंड्यांच्या स्वागतासाठी पिलीव ग्रामपंचायत सज्ज – सरपंच,नितीन माळी
पिलीव/सुजित सातपुते
ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर,इंचगिरी सांप्रदाय,बत्तीस शिराळ,पुसेगाव,कराड या व अशा अनेक गावातून अषाढी वारीसाठी पंढरपुरकडे पायी चालत जाणार्या छोट्या मोठ्या दिंड्यांसह वारकरी माळशिरस तालुक्यातील पिलीव नगरीमध्ये मुक्कामी असतात.आपल्या पिलीव नगरीमध्ये विठ्ठल भक्तांचा एक दिवस मुक्काम होत असल्याने आपल्या गावातील पाणी पुरवठा,वीज पुरवठा,प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व पोलिस कर्मचारी इत्यादी यंत्रणा सज्ज झाली आहे.दिंड्यांच्या मुक्कामाची स्थळे स्वच्छ करुन पालखी मार्गावरील व मुक्कामाच्या ठिकाणावरील विद्युत पुरवठा अखंडीत राहण्यासाठी तसेच कोणताही अपघात होवू नये म्हणून सर्व रोडलाईट्सची दुरुस्ती करुन जागोजागी बल्ब व हायमास्ट दिवे बसवून पिलीव ग्रामपंचायत दिंड्यांच्या व वारकर्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असल्याचे विद्यमान सरपंच नितीन माळी व ग्रामविकासाधिकारी अनिल सावळजकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.