चांदापुरी येथे एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हां दाखल.
पिलीव/सुजित सातपुते
दि.3/7/19
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील मागसवर्गीय विवाहित महिलेला ओढ्यामध्ये धुणे धोत असताना एकटी असल्याच फायदा घेवून छेडछाड करत अश्लील भाषा वापरत शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी चांदापुरी येथील रहिवासी तुकाराम महादेव माने याच्यावर संबंधित पिडीत महिलेने पिलीव औट पोस्टला रितसर तक्रार दिली असून माने याच्यावर विनय भंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हां दाखल झाला आहे.पिलीव औट पोस्टचे पो.ना अभिजीत मोहोळकर,संतोष जगताप व सुरेश गावडे यांनी अरोपीचा शोध घेतला असता अरोपी फारार झाला असल्याचे कळताच अकलुज उपविभागीय पोलिसाधिकारी मंगेश चव्हाण व माळशिरस पोलीस उपनिरीक्षक विश्वंबर गोल्डे यांनी घटनास्थळाला भेट देवून सदर घटनेचा रितसर पंचनामा करुन आरोपीला लवकरात लवकर अटक करुन कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिसाधिकारी मंगेश चव्हाण हे करित आहेत.