पिलीव महावितरणच्या वतीने वह्या वाटप…!
पिलीव/सुजित सातपुते
पिलीव ता माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळा मळा येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा पिलीव यांच्या वतीने मोफत वह्या वाटप करण्यात आले.
पिलीव औट पोस्ट चे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर व महावितरण चे सहाय्यक अभियंता शरद मिसाळ यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.पिलीव महावितरण चे कर्मचारी कै. रोहित पिसे यांच्या स्मरणार्थ मागील वर्षीही या सामाजीक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर या वर्षी ही वह्यांचे वाटप पिलीव परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पोलिस कॉन्स्टेबल गायकवाड, महावितरण चे संजय कांबळे,राजाराम घुगे,अक्षय मेश्राम,नितीन वाघमारे,शाहरुख मुलाणी,दिपक गोरड,रावसाहेब मोरे,अक्षय आवताडे,ओंकार अनुसे,सतिश पारसे,श्रीपाद देशमुख, राजेंद्र धोत्रे,समाधान खरात,नागेश पारसे,संदीप क्षीरसागर,माऊली वाघ,अनिल बाबर ,अमोल धांडोरे,कृष्णदेव काळे,सोमनाथ मगर,राजेंद्र जाधव,शिवचंद भोयर,तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पिसे,विजय पिसे,विजयकुमार नष्टे, आप्पा पिसे,वैभव पिसे,सागर गायकवाड,राजेंद्र काळे मुख्याध्यापिका संगीता बगाडे, सहशिक्षक अनंत देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.महावितरण च्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो ओळी:पिलीव ता माळशिरस येथे महावितरण च्या वतीने जि. प.शाळेत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.