उद्या पिलीवमध्ये ‘राज कलेक्शन’ या वस्त्रदालनाचा भव्य उद्घाटन सोहळा ; ग्राहकांसाठी ५०% सूट व लाखो रुपयांची आकर्षक बक्षीस योजना ! राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह नामांकित व्यक्तींची उपस्थिती

पिलीव/सुजित सातपुते


पिलीवकरांच्या फॅशनविश्वात नवे दालन खुले होत असून,पिलीव येथील मेन रोड,आंधळकर चौक येथे ‘राज कलेक्शन’ या भव्य वस्त्रदालनाचा उद्या शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यास माळशिरस तालुक्यासह सोलापूर,पुणे,सांगली सातारा या जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांसह नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाची उत्सुकता वाढली आहे.


‘राज कलेक्शन’मध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांसाठी कपड्यांची आकर्षक श्रेणी उपलब्ध होणार आहे. सूटिंग-शर्टिंग, जेन्ट्स वेअर, साडी-शालू , चिल्ड्रन वेअर, लेडीज वेअर तसेच होजिअरी अशा विविध प्रकारच्या कपड्यांमुळे ग्राहकांना फॅशनचे विविध पर्याय एकाच छताखाली मिळणार आहेत.
ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बॅनरवर आकर्षक बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. ४,९९९ रुपयांच्या खरेदीवर ७७७७ या बक्षीस योजनेचा खजिना असून,कार, दुचाकी आणि विविध घरगुती वस्तूंच्या बक्षिसांची खैरात दिली असून या योजनेच्या अटी व पात्रतेनुसार ग्राहकांना लाभ घेता येणार आहे.

‘थेट मिल ते ग्राहक’ या संकल्पनेतून ग्राहकांना खरेदीचा चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न ‘राज कलेक्शन’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या वस्त्रदालनाचे ओनर समीर सय्यद व मोहसीन सय्यद यांनी ग्राहकांच्या पसंतीला प्राधान्य देत हे नवे दालन सुरू केले आहे.

या उद्घाटन सोहळ्यास पिलीव व परिसरातील नागरिक, व्यापारी, हितचिंतक आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सय्यद परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *