पिलीव येथील ग्रामस्त व बँक अधिकारी यांच्यात खडाजंगी…!
पिलीव/सुजित सातपुते
दि.4/7/19
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील बँक अॉफ इंडिया हि एकमेव राष्ट्रीय कृत बँक असून बँकेचे पिलीवसह परिसरातील हजारो ग्राहक आहेत.या शाखेत दररोज अंदाजे पन्नास लाखाच्या आसपास उलढाल होत असते परंतु गेल्या तीन दिवसांपासून नेट बंद असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने आज संतप्त ग्राहकांनी बँक अधिकारर्यांना धारेवर धरले होते.शाखा प्रबंधक संतोषकुमार यांना बँकेला टाळे ठोकणार असल्याच्या अशयाचे निवेदन देवून अधिकारी व कर्मचारी यांना बँकेतच कोंडून ठेवण्याच्या तयारीत असणार्या ग्राहकांची पो.ना अभिजीत मोहोळकर यांनी समजूत काढून बँक अधिकार्यांना लवकरात लवकर ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यास सांगितले.यानंतर बँक अधिकार्यांनी वरीष्ठांशी व बी.एस.एन.एल च्या संबधित अधिकार्यांशी संपर्क करुन प्रत्येक ग्राहकाला वीस हजार रुपये पर्यंत रक्कम देण्याची व्यवस्था करुन ठप्प झालेले व्यवहार तात्पुरते तरी चालू केले.यावेळी वीरशैव लिंगायत समाज संघटनेचे पिलीव शहराध्यक्ष उमेश देशमुख,तुषार लवटे,पत्रकार दामोदर लोखंडे,प्रा.संजय पाटील,रिपाइंचे प्रविण वाघमारे,सनी गांधी,अमोल कर्चे,विजय काळे यांसह अनेक ग्राहक उपस्थित होते.
#चौकट :- पिलीवमध्ये राष्ट्रीयकृत बँक एक व ग्राहक अनेक असल्याने ग्राहकांची हेळसांड होत आहे.त्यासाठी आणखी एक राष्ट्रीयकृत बँक होणे गरजेचे असून यासाठी माजी.उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते-पाटील यांच्याकडे मी पाठपुरावा करण्यासाठी विनंती करणार असून मी ही प्रयत्नशील राहणार आहे.
उमेश(आण्णा)देशमुख
अध्यक्ष वीरशैव लिंगायत समाज संघटना पिलीव