सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे धनगर समाजाच्या उन्नतीसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी केला मंत्री महोदय यांचा सन्मान …!

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने धनगर समाजाच्या उन्नतीसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणून एक हजार कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध केल्या बद्दल सद्गुरु श्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन व नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या धनगर आदिवासी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश हाके ,उद्योगपती माननीय सुपेकर ,नितीन पाटील यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली व यापुढेही धनगर समाजाशी स्नेह ठेवावा अशी विनंती करून आम्हाला आपल्या मंत्रिमंडळात बद्दल अभिमान असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास या घोषणेला मूर्त रूप आले असून निश्चितच धनगर समाजाला विकासाच्या दिशा मिळणार असून प्रगतीच्या वाटा दिसू लागल्या आहेत व समाज नक्कीच विकास प्रवाह कडे वाटचाल करण्यात यशस्वी होईल अशी भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *