इतर मागास वर्गीय अल्पसंख्यांकांना ट्रॅक्टरची योजना लागू करा :- वैभव गिते
पिलीव/सुजित सातपुते
राज्यात अनुसूचित जातीतील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर ची योजना चालू आहे या योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदान म्हणजे तीन लाख पंधरा हजार रुपये इतके अनुदान दिले जाते हे अनुदान दुप्पट म्हणजे सहा लाख तीस हजार रुपये केल्यास बचत गटांना मोठे ट्रॅक्टर घेता येतील व बचत गटांची आर्थिक उन्नती होईल व अनुसूचित जातीसाठी असणारा अर्थसंकल्पीत निधी वापरात येईल व तो अखर्चित राहणार नाही ही योजना स्वयंसहाय्यता बचतगटांऐवजी प्रत्येकी व्यक्तींना लागू करण्यात यावी
तसेच ही योजना अनुसूचित जातीं सह इतर मागासवर्गीयांना (ओबीसी भटक्या विमुक्त जाती अल्पसंख्यांक)प्रवर्गातील व्यक्तींना शेतकऱ्यांना कामगारांना सबळ बनविण्यासाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या व्यक्तींना किंवा बचत गटांना शंभर टक्के अनुदानावर ट्रॅक्टर ची योजना लागू करावी
ओबीसी प्रवर्गातील जनता अतिशय गरीब आहे जोपर्यंत त्यांचे जीवनमान उंचावणार नाही तोपर्यंत भारत देश महासत्ता होणार नाही भारत देशाला महासत्ता होण्यासाठी इतर मागासवर्गीयांना ओबीसी भटक्या विमुक्त जाती अल्पसंख्यांक प्रवर्गातील जनतेला शासनाच्या विविध योजना देऊन त्यांना सदन करणे त्यांचे जीवनमान उंचावणे हे शासनाचे कर्तव्य आहे त्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्यांच्या अंतर्गत अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना आहे त्याच धर्तीवर ओबीसी मंत्रालयाने अल्पसंख्यांक विकास विभागाने ओबीसी,भटक्या विमुक्त जाती अल्पसंख्यांक इतर मागासवर्गीयांना 100%अनुदानावर मोठे ट्रॅक्टर देण्याची योजना लागू करावी या योजनेसाठी इतर मागासवर्गीयांच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी
अन्यथा नॅशनल दलित मुमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या कार्यालयासमोर दिनांक 10 जुलै 2019 रोजी आमरण उपोषणास बसणार आहोत याची नोंद घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना देण्यात आले आहे निवेदनावरती राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय नारायण झेंडे पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब विक्रम सोनवणे सोलापूर जिल्हा सहसचिव पंकज काटे यांच्या सह्या आहेत.