विकास धाईंजे यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नदान…!
पिलीव/सुजित सातपुते
रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष विकास धाईंजे यांचा वाढदिवस मौजे गिरवी तालुका माळशिरस येथे चारा छावणीतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नदान तसेच शासकीय योजनांचे मार्गदर्शन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गिरवी गावातील छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता अहिल्यादेवी होळकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विकास धाईंजे, एन.डी.एम.जे.चे राज्य सचिव वैभव गिते, सांगोल्याचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब ठोकळे, भीमराव चंदनशिवे,दत्तात्रेय कांबळे पाटील,रिपाइं तालुकाध्यक्ष नरेंद्र भोसले , किरण धइंजे ,बारामतीचे ॲड.अमोल सोनवणे , बापूसाहेब शीलवंत, महेंद्र गायकवाड, माळशिरस चे ॲड.सुमित सावंत,ॲड.बाबर साहेब,विशाल साळवे, पंकज काटे, प्रा. प्रवीण नलावडे यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विकास धाईंजे म्हणाले की शेतकऱ्यांना कसलीही अडचण आल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना व खते बियाणे शासनाकडून मिळणारा निधी यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांची प्रत्येक अडचण सोडवली जाईल अशी ग्वाही दिली.यावेळी एन.डी.एम.जी चे वैभव गिते यांनी सांगितले की आमदार-खासदारांना जे काम करता आले नाही ते काम विकास दादा यांनी केले आहे व इथून पुढेही करत राहतील.वैभव गिते यांनी पीडित कुटुंबांचे पुनर्वसन व त्यांना शासकीय नोकरी व जमीन मिळवून दिली म्हणून गिरवी येथील शेतकर्यांच्या वतीने वैभव गिते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गिरवी गावच्या माजी सरपंच सावंत मॅडम, पोलीस पाटील सौ राऊत मॅडम, प्रशांत खरात, दादा जाधव महादेव गायकवाड,ग्रामसेवक काळे भाऊसाहेब,गिरवी येथील शेतकरी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लारा सावंत,अधीर सावंत, सुरज सावंत व गिरवी येथील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.