पिलीव औट पोस्टचे पोलीस उपनिरिक्षक प्रमोद सुर्वे यांची बदली रद्द करण्याची गावकर्यांची मागणी…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुका पोलीस कार्यक्षेत्रातील पिलीव औट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सुर्वे यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली असून हावलदार अभिजित मोहोळकर यांची सांगोला तालुका पोलीस ठाण्यात बदली झाली आहे तर नुकतेच रुजू झालेले संतोष जगताप यांची पढरपूर येथे तर हवालदार गावडे यांची विठ्ठल मंदिर समिती येथे बदली झाली असल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक प्रमोद सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रमोद सुर्वे हे तीन वर्षे या ओपीला कार्यरत होते त्यांच्या काळात त्यांनी नागरिक व पोलीस यांच्यात समन्वयाची भूमिका घेऊन या भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करून गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून त्यांनी अनेकांना सहकार्याची व समजूतीची भावना ठेवून तंटे व वाद-विवाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.किरकोळ,कौटुंबीक,बांधाचे व रस्त्याची भांडणे समजूतीने व तडजोड घडवूंन मिटविण्यात त्यांना व त्यांच्या सहकार्यांना यश मिळाले होते.त्यांच्या ठिकाणी कोण बदलून आलेत ते अद्याप समजलेले नाही.परंतु अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने पिलीवसह परिसरातील लोकांच्यातून बदली रद्द करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *