सदगुरु कारखाना म्हणजे उच्चांकी व संपूर्ण बिल देणारा कारखाना होय…!
सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी ,कष्टकरी, ऊसउत्पादक सभासदांचे हित पाहणारा व पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेला सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या आशीर्वादाने सद्गुरु श्री साखर कारखाना लिमिटेड श्री श्री नगर राजेवाडी कारखाना गेली सात वर्षे या भागात कार्यरत असल्याची प्रचिती शेतकऱ्यांमध्ये झाली आहे कारखाना स्थापनेपासून चालू गळीत हंगामात पर्यंत कारखान्याचे संयमी चेअरमन एन शेषागिरी राव , कर्तव्यदक्ष वाईस चेअरमन बाळासो कर्णवर पाटील व सर्व संचालकांच्या पारदर्शक कारभारामुळे आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जिद्दीतून कारखाना नावारूपाला येत असल्याचे जाणवत आहे तीच परंपरा घेऊन यंदाही कारखान्याने सन 2018 2019 च्या हंगामात ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पाठवला आहे त्यांना कारखान्याने पहिला हप्ता 2200रुपये दिलेला आहेच आणि आता रुपये 299 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत त्यामुळे सर्व शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून महाराष्ट्रातील अग्रगण्य कारखाना असून उच्चांकी दर व वेळेवर बिल देणारा कारखाना म्हणून पाहिले जात आहे असे शेतकरी वर्गाकडून समजते.यामुळे सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याच्या संचालक मंडळा बाबत आत्मीयता वाढत असून अनेक संकटावर मात करून उत्कृष्टपणे साखर कारखाना चालत असल्यामुळे शेतकरी कामगार व ऊस उत्पादकांमध्ये कौतुक व समाधान व्यक्त केले जात आहे.