वेदांत सचिन आवताडे याचे स्विमिंग स्पर्धेत यश…!
पिलीव/सुजित सातपुते
तायक्वांदो असोसिएशन पंढरपूर मार्फत आयोजित करण्यात आलेल्या व्यक्तिमत्व विकास शिबीर समर कँपचे आयोजन पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे करण्यात आले होते .सदर शिबीरात अनेक प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील स्विमिंग स्पर्धेत लहान गटात पिलीव ता. माळशिरस येथील पूनम काँम्पुटर्सचे संचालक सचिन आवताडे यांचे चिरंजीव वेदांत सचिन आवताडे याने तिसरा क्रमांक पटकावून ट्राँफी,प्रशस्तीपत्रक प्राप्त केलेबद्दल त्याचा पिलीव ग्रा.पं.चे माजी सदस्य
रघुनाथ गणपत देवकर व परिवाराने सन्मान व सत्कार केला .त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.चि वेदांत याचे जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष उत्तमराव खरात , माजी सरपंच अमोल मदने , एम.एम.यळसंगीकर, श्रीराम क्रिकेट संघ हनुमान व्यायामशाळा पिलीव,पिलीव वि.का.स.से.चे शाँप मँनेजर शिवाजी पिसे ,प्रगतीशील बागायतदार अरूण घोंगडे यांनी अभिनंदन व कौतुक केले.