पीआरपी चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिप कवाडेंनी वाहिली आदरांजली

अकलूज:-राष्ट्रिय अध्यक्ष आमदार प्राध्यापक जोगेन्द्रजी कवाडे,राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले व पत्रकार किरण भोसले यांचे वडील,माजी पुणे जिल्हा पुरवठा निरिक्षण अधिकारी व सेवा निवृत्त नायब तहसिलदार कालकथित अरुण गणपत भोसले यांच्या अकलूज येथील प्रथम पुण्यस्मरण आदरांजली कार्यक्रमास आमदार जोगेन्द्र कवाडे यांचे चिरंजीव व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिप जोगेन्द्र कवाडे यांनी उपस्थिती लावून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे,रिपाई(आ)चे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार,पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रिपब्लिकन युथ फोर्सचे प्रदेश अध्यक्ष कपिलभाई लिंगायत,सोलापूर शहर अध्यक्ष अमित कांबळे,पराग गायकवाड़,माळशिरस तालुकाध्यक्ष बॉबी वाघमारे,युवक तालुकाध्यक्ष गुरु गायकवाड,सोलापूर शहर उपाध्यक्ष अनिल सोनकांबळे,बबलू कांबळे,बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,पत्रकार संघाचे श्रीनिवास कदम पाटिल,जेष्ठ विचारवंत प्रकाश काले,पत्रकार विलास गायकवाड,डी.एस.गायकवाड,बापू भिंगारदिवे,सचिन कांबळे,जावेद कोरबू,अस्लम पठाण यांचेसह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे नेते कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
अभिवादन सभेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे,राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे,रिपाई(आ)चे नंदकुमार केंगार,पत्रकार संघाचे श्रीनिवास कदम पाटिल,बहुजन ब्रिगेडचे किरण साठे यांनी कालकथित अरुण भोसले यांच्या आठवणीना उजाळा देऊन आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे म्हणाले की ज्यावेळी कालकथित अरुण गणपत भोसले यांचे दुःखद निधन झाले त्यावेळी मला येता आले नाही परंतू ज्यावेळी मला या प्रथम पुण्यतिथी कार्यक्रमाची माहिती मिळाली त्यावेळी असणारे सर्व कार्यक्रम रद्द करून नागपूरहुन या आदरांजली कार्यक्रमास आलो आहे.पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले हे आंबेडकरी चळवळीचे प्रामाणिक काम करत आहेत आणि या प्रामाणिक कामामुळेच मी आज त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देण्यासाठी या आदरांजली कार्यक्रमासाठी आलो आहे.
यावेळी कालकथित अरुण भोसले यांचे बंधू बाबुराव भोसले,डॉक्टर दिपक भोसले,मूली,बहिणी,नातवंडे यांचेसह मोठ्या संखेने लोक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *