पिलीव नगरीत जेऊरकर परिवाराच्यावतीने गोंदवलेकर महाराज यांच्या पालखीचे जंगी स्वागत….!
पिलीव/सुजित सातपुते
दि.8/7/19
माळशिरस तालुक्यातील पिलीव गावामध्ये दरवर्षी प्रमाणे लहान-मोठ्या अशा मिळून एकूण अठ्ठावीस दिंड्यांचे व पालख्यांचे आगमन होत असते.त्यापैकीच एक म्हणजे ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पालखी साधारणता एक हजाराच्या आसपास वारकरी सोबत असणार्या या पालखीचे दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे पिलीव येथील अष्टविनायक मित्र मंडळाचे संस्थापक श्री.अविनाश जेऊरकर व माजी.ग्रामपंचायत सदस्या सौ.अणिता जेऊरकर या दांम्पत्याने पालखीचे पिलीव नगरीत आगमन होताच फुलांचा वर्षाव,फटाक्यांची आतषबाजी व पारंपारीक वाद्य वाजवत महाराजांच्या पालखीचे मोठ्या आदराने स्वागत करुन पालखी प्रमुखांचा शाल व श्रीफळ देवून मोठ्या आदराने सन्मान केला.जेऊरकर परिवारांच्या हस्ते स्वागत झाल्यानंतर पिलीव बसस्थानक परिसरामध्ये चोपदार,विणेकरी व वारकरी यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला होता.यावेळी माऊली माऊली माऊली माऊली अशा जयघोषाने पिलीवसह संपुर्ण परिसर भक्तीमय वातावरणात दंग झाल्याचे पहावयास मिळाले.