आत्महत्याग्रस्त पाल्यास चांदापुरी येथील डॉ.कुमार लोंढे यांच्या सोशलचा आधार….!


पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यतील सोशल ही संस्था गेली दहा वर्षे समाजातील वंचित व दुर्बल घटकाकरिता अविरतपणे कार्यरत आहे.मोफत आरोग्य शिबिरे,फिरता दवाखाना,पंढरपूर वारीनिमित्त मोफत वैद्यकीय सेवा,रक्तदान शिबिरे,लाडली योजनेअंतर्गत लग्नास सहाय्य,दुर्धर आजारास मदत,शालेय साहित्य मदत इ सेवा शासनाची कोणतीही आर्थिक मदत नसताना स्वताच्या उत्पन्नातील काही भाग खर्च करून डॉ.लोंढे दाम्पत्य हे उत्तरदायित्व जपत आहे.
पिलीव (झंजेवस्ती) येथील बापू रंभाजी वाघमारे यांनी अज्ञात कारणाने स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत त्यातील कर्मवीर विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकणारी कु.दीक्षा बापू वाघमारे हीचा आठवीपासून बारावी पर्यंतचा संपूर्ण खर्च सोशल या संस्थेच्या वतीने करणार असल्याचे संस्थेचे सर्वेसर्वा डॉ.कुमार लोंढे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. डॉ.लोंढे दाम्पत्यांची मदत करण्याची व सहकार्याची भावाना सर्व धनदांडग्यांना मिळो आणि आत्महत्याग्रस्त पाल्यांचा खडतर प्रवास टळो असे म्हणले तर वावगे ठरणार नही आणि एका विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
संस्थेचा मदतनिधीचा चेक व शैक्षणिक साहित्य मदत म्हणून देण्यात आले यावेळी सोशल संस्थेचे संस्थापक डॉ.कुमार लोंढे,अध्यक्ष डॉ.पंचशीला लोंढे,अंकुश देवकते,हर्षल वाघमारे,शंकर वाघमारे, झंजेवस्ती सरपंच इ उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *