अभिराज उबाळे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्यांवर गुन्हां दाखल करावा या मागणीचे पिलीव पत्रकार संघाच्यावतीने निवेदन…!

पंढरपूर येथील पत्रकार अभिराज उबाळे यांना नाहक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पिलीव येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ,पंढरपूर येथील पत्रकार अभिराज उबाळे यांनी पंढरपूर मधील नेत्यांची नावे घेत स्मशानभूमीत आत्महत्येचा लाईव्ह प्रयत्न केला. फेसबुक लाइव्ह मधून अभिजित उबाळे यांनी असे सांगितले आहे की पंढरपूर येथील एक जिल्ह्याचा नेता,एक पत्रकार, एक कार्यकर्ता, एक पोलीस अधिकारी, एक महिला ही मंडळी गेली काही दिवस त्यांना त्रास देत असून पंढरपूर येथील नेत्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या साऱ्या त्रासाला कंटाळून पत्रकार उबाळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.समाजामध्ये घडत असलेल्या घटनांना निर्भीड पणे ते बातमीद्वारे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतात.अशा पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे,आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा घटनांमध्ये वाढ होत चालली असून यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.
अभिराज उबाळे व त्यांचे कुटुंबीय सध्या दहशतीखाली असून त्यांना त्वरित संरक्षण मिळावे,तसेच सदर आरोपींवर चौकशी करून कडक कारवाई करावी अन्यथा पिलीव पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,संजय पाटील, प्रमोद भैस,अभिजित तावरे,सुजित सातपुते,उदय कदम,शाहरुख मुलाणी,शुभजीत नष्टे,गणेश देशमुख,सतिश पारसे यांच्या सह्या आहेत.
सदर निवेदन पिलीव औट पोस्ट चे पोलीस नाईक अभिजित मोहोळकर ,गावडे यांनी स्वीकारले.