त्या चिमुरड्यावर झालेल्या अत्याचाराचा पिलीव येथे जाहीर निषेध…!
पिलीव/सुजित सातपुते
आर्वी जिल्हा वर्धा येथील मंदिरात प्रवेश केला म्हणून मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलाला अमानुषपणे कडक उन्हात गरम फरशीवर नग्न अवस्थेत बराचवेळ उताने झोपविल्यामुळे त्या मुलाच्या पृष्ठभागावर मोठे फोड आले व त्याला रात्रभरही तसेच तडफडत ठेवले होते.मंदिरात प्रवेश केला म्हणून इतकी क्रुर शिक्षा दिली व त्याचेवर चोरीचा आळ घेऊन आरोप केला आहे.या घटनेचा पिलीव येथील बहूजन समाजाच्यावतीने पिलीव पोलीस ठाण्यात निषेधाचे निवेदन देवून निषेध नोंदविण्यात आला.सदरचे निवेदन हे पिलीव औट पोस्टचे पोलिस नाईक अभिजित मोहोळकर यांनी स्विकारले असून सदरच्या निवेदनात त्या नराधमावर ॲट्रासिटी व अंधश्रध्दा प्रतिबंध कायद्याखाली कडक कारवाई करावी आशी मागणी केली आहे.निवेदनावर माजी सरपंच आप्पासाहेब लोखंडे,सोशल डेव्हलपमेंटचे संस्थापक डॉ.कुमालार लोंढे,ग्रा.पं सदस्य गणेश लोखंडे,रिपाइं शहराध्यक्ष संजय करडे,सागर लोखंडे,कुमार लोखंडे,तानाजी लोखंडे,आबा बनसोडे,ब्रम्हदेव लोखंडे समाधान लोखंडे,दिनेश लोखंडे,हणुमंत लोखंडे आदि मान्यवरांनी स्वाक्षर्या करुन न्यायाची मागणी केली आहे.यावेळी सदरचे निवेददन पुढील कारवाईसाठी तातडीने पाठवित आसल्याचे हवालदार अभिजित मोहोळकर यांनी पिलीव अपडेटशी बोलताना सांगितले.