पिलीव पोलिसांचा शिंगोर्णी येथील जुगार अड्ड्यावर छापा…!

पिलीव/सुजित सातपुते

मी पो.कॉ.ब.नं 114 स्वप्नील संभाजी गायकवाड ने.पिलीव दुरक्षेत्र माळशिरस पोलीस ठाणे समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब लिहुन देतो की,
मी माळशिरस पोलीस ठाणेत नेमणुकीस असुन सध्या मी पिलीव दुरक्षेत्र पोलीस ठाणेस मदतनीस म्हणुन काम करीत आहे.
आज दि.13/06/2019 रोजी 17/00 वा सुमारास मा.पोनि/गोल्डे सो माळशिरस पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शना खाली मी व पोसई /सुर्वे सो, एएसआय/जगताप , पोहेकॉ/1080 गावडे ,पेाना/1682 मोहोळकर, असे मिळुन शिंगोर्णी गावामध्ये पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिंगोर्णी गावातील बापु गोडसे यांचे पडीक घराचे पाठीमागे काही इसम मन्ना नावाचा जुगार खेळीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेने दोन इमसांना पंच म्हणुन बोलावुन घेवुन त्यांना बातमी प्रमाणे हकीकत सांगुन ते पंच म्हणुन येणेस तयार झालेवर आम्ही स्टाफ पंचासह बातमीत नमुद ठिकाणी गेलो असता तेथील बापु गोडसे यांचे पडीक घराचे पाठीमागे काही इसम गोलाकार करुन बसलेले दिसले. सदर इसमांचे हातात काही पत्याची पाने व समोर काही पत्याची पाने पडलेली होती. त्यांना पोलीसांची चाहुल लागताच हातातील पत्ते तेथेच टाकुन पळुन जात असताना सदर ठिकाणी सदर इसमापैकी इसम नामे 1) धनाजी महादेव बोडरे वय 25 वर्षे रा. शिंगोर्णी 2) संजय रामचंद्र काळे वय 29 वर्षे रा.शिंगेार्णी 3 ) शामराव औंदुबर दगडे वय 36 वर्षे रा.शिंगोर्णी हा मिळुन आलेने त्यांस ताब्यात घेतले. व इतर तसेच सदर पकडलेल्या इसमाकडुन पळुन गेलेले इसमाची त्यांचे नाव व पत्ता याबाबत चौकशी केंली असता त्यांची नावे 4) मंगेश रामचंद्र गारगुंड 5) तानाजी श्रीमंत हजारे 6) उमेश बापुराव गोडसे सर्व रा.शिंगेार्णी ता.माळशिरस जि.सोलापुर असे असल्याचे सांगीतले. तसेच सदर नावाबाबत आम्ही ,खात्री केली असता वरील इमस हे सदर ठिकाणी जुगार खेळत असल्याचे समजले आहे. सदर ताबेत घेतलेले इसम नामे 1) धनाजी महादेव बोडरे वय 25 वर्षे रा. शिंगोर्णी यांचे ताब्यात 100/- रुपये रेाख रक्क्म (50 रुपये दराचा दोन चलनी नोटा ) 2) संजय रामचंद्र काळे वय 29 वर्षे रा.शिंगेार्णी यांचे ताब्यात 3650/- रुपये रेाख रक्क्म (500,100,50 रुपये दराचा चलनी नोटा ) 3) शामराव औंदुबर दगडे वय 36 वर्षे रा.शिंगोर्णी यांचे ताब्यात 1800/- रुपये रेाख रक्क्म ( 500,100 रुपये दराचा चलनी नोटा ) व जागेची झडती घेतली असता त्यांचे जवळ पंचनामेत नमुद वर्णना प्रमाणे जुगार साहीत्य व एकुण रोख रक्क्म 5550/- रुपये किंमतीचा मुददेमाल व बावनपानी पत्याचा डाव मिळुन आला तो पोसई/सुर्वे सो यांनी जप्त करुन ताबेत घेतला. व जप्त जुगार साहीत्यास व रोख रकमेस पोलीस व पंचाचे सहीचे कागदी लेबल लावले आहे. व गुन्हयाचे तपासकामी ताबेत घेतलेले आहे.
तरी आज दिनांक 13/06/2019 रोजी 17/00 वा.चे सुमारास शिंगोणी गावातील बापु गोडसे यांचे पडीक घराचे पाठीमागे यातील आरोपी नामे 1) धनाजी महादेव बोडरे वय 25 वर्षे रा. शिंगोर्णी 2) संजय रामचंद्र काळे वय 29 वर्षे रा.शिंगेार्णी 3 ) शामराव औंदुबर दगडे वय 36 वर्षे रा.शिंगोर्णी 4) मंगेश रामचंद्र गारगुंड रा. शिंगोर्णी 5) तानाजी श्रीमंत हजारे रा. शिंगोर्णी 6) उमेश बापुराव गोडसे रा. शिंगोर्णी ता.माळशिरस जि.सोलापुर यांनी गोलाकार बसुन बावन पानीपत्याचे डावावर मन्ना नावाचा जुगार पैशावर खेळीत असताना वरील वर्णनाचा रोख रक्क्म व जुगार साहित्यासह मिळुन आले आहेत म्हणुन माझी त्यांचे विरुध्द मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *