काळमवाडी येथे सहकार महर्षीच्यावतीने दादा शिंगाडे यांच्या प्रयत्नातून टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील 1800 ते 2000 च्या आसपास लोकसंख्या असणार्या काळमवाडीला गावाला यावर्षी पहिल्यांदाच तीव्र पाणी टंचाई भासवली गावाला पाणी देणे हे आपले कर्तव्य समजून शिवामृत दुध संघाचे संचालक दादा शिंगाडे यांनी सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहीते-पाटील,धैर्यशील मोहीते-पाटील,अर्जुनसिंह मोहीते-पाटील व स्वरुपाराणी मोहीते-पाटील यांना भेटून व वेळोवेळी पाठपुरावा करुन मा.खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सहकार महर्षी साखर कारखान्याच्यावतीने काळमवाडी गावला टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा सुरु केला व पाणी वाटपा सोबतच पाणी जपुन वापरा आणि पाणी बचत करा असा संदेशही त्यांनी दिला आहे.काळमवाडी गावातील शाळा व मंदीर परिसरातील झाडांनाही शक्य होईल तेवढे पाणी देवून झाडे जगविण्याचा प्रयत्न चालू असल्याने हा एक कुतुहलाचा विषय बनला आहे.दुष्काळामुळे पाण्याची तीव्र कमतरता जानवल्याने मिळेल तेवढे पाणी खुप झाले असे म्हणुन दादासाहेब शिंगाडे यांचे गावातील माता भगिनिंनी आभार मानले.यावेळी सरपंच ज्ञानदेव करडे,चेअरमन संजय शिंगाडे,रामचंद्र पवार,कदीर पठाण,देविदास शिंदे,समाधान दुपडे,मुकिंदा पवार,विक्रम शिंदे,माणिक शिंदे,प्रकाश शिंदे यांसह काळमवाडी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *