वैभव गीते यांचा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार…!
माळशिरस तालुक्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय जनतेला साडेतीन लाख रुपये किंमतीचा एक असे एकूण ११३ ट्रॅक्टर मिळवून दिले व सर्व कुटुंबांना रोजगार मिळवून दिला. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा शासनास सुधारित शासन निर्णय काढण्यास भाग पाडून महाराष्ट्रातील भूमीहीन दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जातीच्या व्यक्तींना जमिनी मिळवून देणे, महाराष्ट्रातील जातीय अत्याचारात खून झालेल्या कुटुंबांना शासकीय नोकरी,जमीन व पेन्शन मिळवून देऊन त्यांचे पुनर्वसन करणे, जातीय अत्याचारात बळी पडलेल्या लोकांसाठी २५ कोटी निधी मंजूर करून आणणे, दलीत, आदिवासींच्या हक्काचा निधी अखर्चित राहू नये म्हणून सरकारने बजेटचा कायदा करावा यासाठी महाराष्ट्रभर अभियान राबवून जनजागृती करणे, महाराष्ट्रभर एट्रोसिटी अॅक्ट बद्दल जनजागृती करणे. याबद्दल वैभव गीतेंच्या सामाजिक कामाची दखल घेऊन अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दलितांमध्ये आनंदाचे वातावरण आहे