पिलीव येथील आर्या घाटे हिने पिलीव गावचे नाव गुणवत्ता यादीत झळकविले…!
पिलीव/सुजित सातपुते
मेरी माता हायस्कुल म्हसवड या शाळेत शिकत असणारी माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील ॲड.अजय प्रकाश घाटे यांची कन्या कु.आर्या अजय घाटे हिने 95 % मार्क घेऊन गुणवत्ता पिलीव गावचे नाव झळकविले आहे.इंग्लिश मध्ये 82 तर हिंदी मधे 95 मराठी मधे 86 मॅथ मध्ये 99 आणि साइन्स &टेक्नॉलॉजी 96 आणि सोशियल साइन्स 99 असे एकुण 500 पैकी 475 गुण आर्याला मिळले आहेत.हिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे मार्गदर्शक शिक्षक फादर वर्गिस,फादर जॉमी,शिक्षक वर्ग,तिचे अजोबा माजी सरपंच प्रकाश घाटे,वडील ॲड.अजय घाटे,आई ॲड.असावरी घाटे यांनी व पिलीव पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी आर्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.