विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रीयेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे जुनच्या अगोदरच तयार ठेवावी-शिवराज पुकळे(युवासेना माळशिरस विधानसभा प्रमुख युवाअधिकारी)


पिलीव/प्रतिनिधी

   दरवर्षी विद्यार्थांना शैक्षणीक प्रवेशासाठी लागनारी कागदपत्रे काढन्यासाठी जुन-जुलै महिन्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये झुंबड उठलेली दिसते त्या पार्श्वभुमीवर विविध शैक्षणीक प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे जुन महिन्याच्या अगोदरच काढुन ठेवली पाहीजेत.कारण जुन महिन्यामध्ये विविध शैक्षणीक निकाल लागतात.निकाल लागल्यानंतर  प्रवेशासाठी ठरावीक कालावधी दिला जातो त्यामध्ये प्रवेश कुठे घ्यायचा ,कशाला घ्यायचा असे विविध प्रश्न विद्यार्थी व पालक यांच्यापुढे असतात अशामध्येच कागदपत्रे काढन्यासाठी सगळेच गर्दी करत असतात त्यामुळे प्रमाणपत्रे मिळन्यासाठी अडचन निर्माण होऊ शकते म्हनुन लवकरच आपली कागदपत्रे काढुन घ्यावीत असे आवाहन युवासेना माळशिरस विधानसभा युवाअधिकारी मा.शिवराज पुकळे यांनी केले आहे.
          प्रवेशासाठी विद्यार्थांना जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,नाँनक्रिमीलेअर,डोमासाईल,शेतकरी दाखला अशा प्रकारचे विविध प्रमाणपत्रे आवश्यक असतात.यामधील तहसीलदार यांच्याकडुन मिळनारी कागदपत्रे 7 दिवसांत मिळतात व प्रांतअधिकारी यांच्यापासुन मिळनारी कागदपत्रे 15 दिवसांनी मिळतात त्यामुळे निकालानंतर जर कागदपत्रे काढायची म्हटले तर विद्यार्थी व पालक यांना माणसीक त्रास व आर्थीक नुकसान सहन करावे लागते त्यामुळे लवकरच विद्यार्थांनी आपनास आवश्यक कागदपत्रे जुनच्या अगोदरच काढुन घ्यावीत असे आवाहन करन्यात आले.
             तसेच जर कागदपत्रांसाठी काही अडचनी आल्यास शिवसेना-युवासेना माळशिरस विधानसभा,शिवराज पुकळे युवाशक्ती,गजराज ग्रुप ,संघर्ष युवा दोस्ती ग्रुप,फ्रेंडस ग्रुप च्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा आपनास पुर्ण सहकार्य केले जाईल असे युवासेना माळशिरस विधानसभा युवाअधिकारी शिवराज पुकळे यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *