पाणी चोरी प्रकरणी सदगुरु कारखान्याचे मालक व टँकर चालक यांच्यावर गुन्हां दाखल…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव गावच्या शिवारात अनाधिकृतपणे निरा-उजवा कालव्याच्या प्रवाहातून पाईपच्या साह्याने पाण्याचा उपसा करुन ते पाणी आठ मोरी नजीक पश्चिम बाजूस असलेल्या 150 मिटर अंतरावरील 18-13-11 मीटर खड्यात साठवून त्यातील पाणी 20 HP इलेक्ट्रिक मोटार द्वारे टँकर नंबर MH-10 Z 7007 व MH 04 H6915 यामध्ये भरुन श्री श्री सदगुरु साखर कारखाना राजेवाडी जि.सांगली येथे घेवून जात असताना मिळून आले असून त्यांनी निरा-उजवा मुख्य कालव्यातील आज तागायत बेमाप पाण्याची चोरी केली असल्याने कारखान्याचे मालक व टँकर चालक यांच्या विरुध्द सरकार तर्फे भादवि स कलम 379 व महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 93 अशा स्वरुपाच्या दिनांक 7 मे व दिनांक 8 मे रोजी दोन फिर्यादी सरकार तर्फे उपविभागीय अभियंता उदयकुमार माणकापुरे यांनी पिलीव पोलिसांत दिल्या असून पुढील तपास पोलिस नाईक अभिजीत मोहोळकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *