रामचंद्र मदने-पाटील यांनी वयाच्या 102 व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क…!

पिलीव/सुजित सातपुते
माढा लोकसभा मतदारसंघासाठी पिलीव परिसरातून काल सरासरी 65 टक्के मतदान झाले असून पिलीवच्या मतदारांचा झिंजेवस्तीच्या मतदार यादीत समावेश झालेने मतदारांची धावपळ उडाली.यावेळी अजय मदने यांचे अजोबा जेष्ठ नागरिक रामचंद्र नाना मदने-पाटील यांनी वयाच्या 102 व्या वर्षी तर भिमराव तुकाराम मदने-पाटील यानी95व्या वर्षी कुणाचीही मदत न घेता मतदानाचा हक्क बजावला.पोलीसखात्याने निवडणूक आयोगाच्या व पोलीस अधिक्षकाच्या आदेशानुसार मतदान केंद्रापासून दोनशे मीटर अंतरावरील दुकाने व रहदारी वाहतूक बंद ठेवली होती.37,1.37.3 कलमानुसार चार माणसापेक्षा जास्त माणसे एका ठिकाणी थांबण्यास बंदी घातली होती.तसेच जेष्ठ नागरिक,अपंग मतदारांच्या मदतीसाठी पिलील येथील जवाहर शेतीकी विद्यालयातील विद्यार्थ्यानी स्वयंसेवक म्हणून काम केले. तर मतदान केंद्रावर प्राथमिक औषधोपचाराची,व्हीलचेअरची सोय केली होती.यावेळी खा.विजयसिंह मोहिते पाटील,अर्जूनस़िंह मोहिते पाटील,संग्रामसिंह जहागिरदार, राहूल मदने,भजनदास चोरमले,के.के. पाटील,सचिन पडळकर यानी मतदान केंद्राला भेटी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *