नेत्यांच्या बैठकीनंतरही बचेरीकर मतदानावरील बहिष्कारावर ठामच…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरश तालुक्यातील बचेरी ग्रामस्थानी पिण्याला व शेतीला पाणी मिळावे म्हणून येत्या लोकसभेच्या निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा नीर्णय घेतला आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आसून देशाचे भवितव्य घडवणारी आसल्याने मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याची विनंती करण्यासाठी बचेरी गावच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची पं.स.सदस्य अर्जूनसिंह मोहिते पाटील यानी बैठक आयोजित केली होती.यावेळी जि.प.चे माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार,प्रताप पाटील,जि.प.सदस्य गणेश पाटील यानी ग्रामपंचायतीच्यावतीने सादर करण्यात आलेला राष्टीय पेयजल योजनेचा सत्तर लाख रुपये रक्कमेचा प्रस्ताव निवडणूक झाल्या झाल्या लगेचच मंजूर केला जाईल व त्याचे कामही लवकर सूरू करू अशी खात्री गावकर्यांना दिली.तरीही ग्रामस्थांची मागणी निवडणूकीपूर्वीच काम करावे लागेल अशी होती तसेच तूर्तास6.कि.मीटर अंतरासाठी लागणार्या पाईपा तुम्ही तुमच्या पदरने द्या आसा आग्रह धरला मात्र निवडणूकीनंतर सदरचे काम करण्यावर नेतेमंडळी ठाम होती.कारण आचारसंहितेत कांही करता येत नाही.तसेच निरादेवधर योजनेतून गारवाड, सूळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी गावाचा समावेश करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न चालू आहेत,त्यामुळे शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सूटू शकेल तसेच ग्रामपंचायतीच्या मागणी प्रस्तावाप्रमाणे टँकरच्या खेपा आजपासूनच वाढवित आसल्याचे सांगितले.व बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली.एकेक मत महत्वाचे असून प्रत्येक व्यक्तीचे मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.असे मोहीते पाटील यांनी सांगितले.यावेळी उपस्थित आसलेल्या कार्यकर्त्यानी व ग्रामस्थानी आम्ही सर्व ग्रामस्थांची बैठक घेऊन फेरविचार करुन कळवितो असे नेते मंडळींना सांगितले.परंतु पिण्याच्या पाण्याची सोय केल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही आशीच बैठक संपल्यानंतर चर्चा सुरू होती.यावेळी,सरपंच कुसुमताई माने, उपसरपंच, सूदाम शिंदे, माजी सरपंच, पोपट गटकुळे, लक्ष्मण गोरड,शिवाजी सावळजकर, वामन शिकारे, नारायण शिंदे,विश्वजित गोरड, शंकर शिंदे,बिरा शिंदे, गणेश गोडसे शिवराज पूकळे, गणेश देशमुख, विनोद यादव, विनोद काटे व ग्रामस्थ उपस्थित होते.