सोशलच्या वतीने दुष्काळग्रस्त व्यक्तींना मोफत आरोग्य सेवा…!
पिलीव/सुजित सातपुते
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून सर्वसामान्य आर्थिकदृष्ट्य दुर्बल घटकासाठी संस्था गेली दहा वर्षे मोफत आरोग्य शिबिरे, पंढरी वारकरी लोकांस मोफत वैद्यकीय सेवा,शालेय साहित्य मदत,गरजू रुग्णास मदत,रक्तदान शिबिरे, महापरिनिर्वाण दिनी मोफत मुबई येथे रुग्ण सेवा,ग्रामीण भागातील मुलांकरिता पहिली ते बारावी निवासी शाळा,गरीब दाम्पत्यास लग्नास मदत अशा विविध मुद्यावर संस्था कार्यात अग्रेसर आहे
भीषण दुष्काळाचा सामना व त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यातून जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने माळशिरस तालुक्यतील लोकांना मोफत तपासणी करून मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे तरी दुष्काळग्रस्त भागातील वृद्ध,दुर्बल,गरीब ,मागास ,विधवा यानी आजार अंगावर न काढता अंकुर चॅरिटेबल हॉस्पिटल चांदापुरी ता.माळशिरस येथे डॉ.पंचशीला व डॉ.कुमार लोंढे यांचेकडे संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे .सदर मोफत वैद्यकीय सेवा सोशल डेव्हलपमेंट सोसायटी व सोशल बहुउद्देशीय संस्था यांचे वतीने आयोजन करण्यात येत आहे.सदरच्या नाविण्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन केल्याने डॉ.लोंढे दाम्प्त्याचे तालुक्यासह जिल्हातून कौतुक व अभिनंदन होत आहे.