अखेर माळशिरस तालुक्यातील बचेरी गावचा मतदानावर बहिष्कार…!
पिलीव आपडेट/बचेरी
माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी परीस्थीतीशी सामना करत असलेलं हे बचेरी गाव या गावाची लोकसंख्या तिन ते चार हजार आहे आज पिण्याच्या पाण्यासाठी हे गाव दाहीदिशा धुंडाळत असताना प्रश्न उभा ठाकतो आहे की,स्वातत्र्यानंतरच्या ७० वर्षांत पिण्याच्या पाण्याला महाग झालेल्या या बचेरी गावातील जनतेचा अपराध तरी काय ?
येथील गावकर्यांना एकच प्रश्न पडलाय ना पिण्याचे पुरेसे पाणी,ना शेतीचा विकास अशा स्थीतीत हाताला काम देणारा औद्योगिक विकास तरी कोसो दुरच राहिला.मग जगायचे तरी कसे आणि कोणाच्या भरवशावर
बचेरी गाव आज कधीतरी येणार्या टँकरच्या वेळेशी आपली दैनंदिन जीवनपध्दती घडवत आहे.दळवळणाच्या सोयीमुळे गाव तिथे एसटी पोहचली, पण माणसे तिथे पाणी पोहचलेच नाही. हे बचेरी गावावरुन समजतं. आज बचेरी गावातील तरुणाचं रोजीरोटी साठी मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतर होताना दिसत आहे.
गावाच्या जुन्या संस्कृती ची माणचे मात्र माझी धरणीमाय म्हणत गावतच राहिली त्यांची दुसरी पिढी आजही पाण्यासाठी टाहो फोडत आहे.गावात जनावरे तर मोजकीच राहिली.कारण दुष्काळाने हे चक्रच उद्ध्वस्त केले आहे. बचेरी हे गाव दुष्काळाच्या कराल दाढेत सापडले आहे.पाण्यासाठी येथील लोक टँकरच्या डोळे लावुन दिवस दिवसभर बसुन राहतात.हातातोंडाची गाढ पाडण्यासाठी रोजगार करायचा कारायचा की,पाण्यासाठी प्रतिक्षा करत बसायची.हाच प्रश्न बचेरी गावांमधे रोजच्या जगण्यातील महत्त्वाचा ठरला आहे रानात गेले तर काम नाही,गावात आले तर पेयला पाणी नाही.हि परीस्थीती आज या गावामधे निर्मान झाली आहे.गावामधे कायम दुष्काळ असल्यामुळे जनावराच्या दावणी मात्र रिकाम्या झाल्या.दुभत्या जनावरालाच चारा नाही तर भाकड जनावरं सांभाळची कशी त्यांच्यासाठी कत्तलखाण्याची वाटच सोयीची ठरली आहे.
बचेरी या गावामधे नेतेमंडळी तर येतात पण फक्त निवडणुकीच्या आगोदर मतं मागायला आणी अश्वासन देयला आजपर्यंत हितं येणार्या प्रत्येक नेत्यांनी पाण्यासाठी फक्त पोकळ आश्वासन दिली आहेत.काम मात्र काहीच नाही शेवटी बचेरीतील गावकर्यांनी नेत्यांच्या आश्वासनांना कंटाळुन येणार्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे