पिलीव ग्रा.पं.सदस्या सौ.वैष्णवी गूजरे यांचा राजीनामा…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जहागिरदार पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्या सौ.वैष्णवी संतोषकुमार गूजरे यांनी नुकताच सदस्यपदाचा राजीनामा नूतन सरपंच नितिन विठ्ठल मोहिते यांचेकडे सूपूर्त केला आहे.त्याप्रमाणे सदरचा राजीनामा मासिक मिटींग मध्ये मंजूर करण्यात आला आहे.सदरचे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकारी यांचेकडे पाठविणार आसल्याचे ग्रामविकास अधिकारी अनिल सावळजकर व सरपंच नितिन मोहिते यांनी सांगितले.सौ.वैष्णवी गूजरे या आंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असून पदभार स्विकारलेनंतर सात दिवसाच्या आत दोन्हीपैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागतो.आंगणवाडी सेवकपदाला मानधन मिळते व त्यांच्यावर घरप्रपंच चालतो म्हणून सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
त्यांच्या राजीनाम्यामूळे दोन्ही पार्ट्यांची सदस्य संख्या समान 8/8अशी झाल्याने आता त्या जागेसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम रितसरपणे जाहिर होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *