महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवनारे नेते मा. बाळासाहेब आंबेडकर-पंकजकुमार काटे

मा. श्रध्देय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांचा जन्म 10 मे1954चा. ‘बाळासाहेब’ याच नावाने ते अधिक लोकप्रिय. एक भारतीय राजनीती तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते,भारीप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि परम. पुज्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू हीच त्यांची आज पर्यंत ची प्राथमिक ओळख परंतु आज ते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ‘किंगमेकर’ भुमिका वटवत आहेत त्याला कारणही तसेच आहे कारण आज ते या महाराष्ट्रात प्रथमच इथल्या अलुतेदार, बलुतेदार, शोषित, वंचित घटकांना इथला ‘राजा’ बनवू पहात आहेत. बाळासाहेबांच्या अलीकडील जीवनावर प्रकाश टाकल्यास आपणास असे जाणवेल की, गुजरात मध्ये जे ‘उणा’ प्रकरण घडलं त्या मध्ये प्रथम बाळासाहेबांनी या प्रकरणातील शोषित, पिडीत घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न राष्ट्रीय स्तरावरुन केला आणि नेमक्या याच गोष्टी वरुन या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर कार्यक्रमात दलितांना मारण्याआधी मला गोळ्या घाला अशी केविलवाणी लबाड, ढोंगी घोषणा केली. या गोष्टीचा सारांश मित्रानो लक्षात घ्या या ठिकाणी जास्त खोलात जाऊन लिहता येत नाही. या नंतर जे रोहीत वेमुल्ला प्रकरण झाले त्या प्रकरणात बाळासाहेबांनी सक्रिय सहभाग घेऊन तीव्र अशी आंदोलन केली या आंदोलनाचे फलित असे समजावे की, रोहीत वेमुला च्या आईने मुंबई येथील आंबेडकर भवन येथे येवुन बौध्द धम्म स्विकारला आणि हीच धार्मिक परिवर्तनाची नांदी ठरते की काय असे वाटल्याने या विषमता वादी, जातीवादी सरकारने dr. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले व आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आंबेडकरभवन अचानक रात्री पाडले याही वेळेला जो बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका व केलेला पाठपुरावा लाजवाब च होता. हे आपणास मुंबई येथे भर पावसात झालेल्या मोर्चातुन जाणवते. या दरम्यानच्या उत्तर प्रदेशात भिम आर्मी प्रमुख मा.चंद्रशेखर आझाद च्या माध्यमातून एक युवा दलित नेतृत्व पुढे येत होत पण या नेतृत्वाला या जातीवादी सरकारने रासुका सारख्या कायद्याचा गैर वापर करून त्यांना जेल मध्ये टाकण्याचं पाप या सरकारने केलं पण याही वेळेला मा.बाळासाहेब आंबेडकर चंद्रशेखर आझाद यांना लखनौ च्या जेल मध्ये भेटायला गेले त्यांना कायदेविषयक सल्ले तर दिलेच परंतु त्यांच्या साठी लखनौ येथे मोर्चा आयोजित करून आंदोलन केले या प्रकारचे आंदोलन त्यांनी दिल्ली येथे ही चंद्रशेखर च्या सुटकेसाठी केले चंद्रशेखर जेव्हा महाराष्ट्रात भिमाकोरगावे या ठिकाणी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आले तेव्हा प्रशासनाने त्यांना नजरकैदेत ठेवल त्याही वेळेला बाळासाहेबांनी त्यांची नजरकैद ही बेकायदेशीर आहे असे माध्यमांना सांगुन सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला यात मला एकच सांगाव वाटते की, बाळासाहेब हे आंबेडकरी चळवळीतील नव युवा नेतृत्वाला सहकार्य करतात. त्या नंतर बाळासाहेबांनी पुणे शनिवार वाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करून देशभरातील समविचारी 249विविध संघटनांना एकत्रित करून देशातील उमर खालिद, जिग्नेश मेवानी या सारख्या युवा नेतृत्वाला संधी दिली या परिषदेच्या माध्यमातून या देशातील जातीवादी,विषमता वादी व्यवस्थेचा बुरखा फोडण्याचे काम केले. या एल्गार परिषदेच्या आयोजनावरून त्यांच्यावरती गंभीर अशा स्वरूपाचे आरोपही करण्यात आले त्यांच्या सख्या बहिणीचे मिस्टर असणारे आनंद तेलतुबडे यांनाही या प्रकरणी गोवण्यात आलं पण बाळासाहेब मात्र अशा संकट प्रसंगी तिळमात्र ही आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत यातूनच त्याच्यात असणारा कणखर बाणा सिध्द होतो. यानंतर 1 जाने 2018 रोजी भिमाकोरे गाव येथे पेशव्यांच्या पराभवाचे प्रतिक असलेल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखो भिम सैनिकांवरती जो भ्याड हल्ला करण्यात आला त्याही वेळेला ते समाजाच्या पाठीमागे ठाम पणे उभे राहिले या वेळी या महाराष्ट्रातील तमाम अलुतेदार बलुतेदार शोषित भीम अनुयायी यांच्यात एक तीव्र अशी संतापाची लाट उसळली होती यावेळेला मा.बाळासाहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक देऊन या संतापाला वाट मोकळी करून दिली. हे आंदोलन चिरडून टाळण्यासाठी सरकारने पोलिस बळाचा गैरवापर केला व आंदोलकांवरती खोट्या केसेस दाखल केल्या याही वेळेला बाळासाहेबांनी समाजातील वकिलांना कार्यकर्त्यांच्या वरील केसेस मध्ये सहकार्य करण्यासाठी आव्हान केले आणि वकिलांनी ही बाळासाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत या केसेस विना शुल्क स्विकारल्या. या दंगलीला कारणीभूत एल्गार परिषद आहे असा पोलीसांनी आरोप केला या वेळी या देशाचे केंद्रीय समाजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेबांनी माध्यमांशि बोलताना स्पष्ट केले की भिमाकोरेगाव येथील जातीय हिंसाचारास एल्गार परिषद जबाबदार नाही.
भिमाकोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणी स्वतः आदरणीय बाळासाहेब आंबेडकर पुणे येथे आयोगापुढे बाजू मांडन्यासाठी वकील म्हणून उभे राहिले
याच्या अगोदर राष्ट्रीय पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारी ची अॉफर असताना धुडकावून लावली ही काही साधी गोष्ट नाही त्याच प्रमाणे व्ही. पी. सिंग व राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री ची ही अॉफर त्यांनी धुडकावून लावली आहे आणि हे रक्त बा भिमाचे स्वाभिमानी आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. जर त्यांनी मनातचं आनलं असतं तर ते कधीच सत्तेच्या बाहेर राहीले नसते पण ते आजही गर्वाने सांगतात की मी आजही माझ्या आजोबांच्या राजगृहात राहतो.खासदारकीच्या पेन्शन वरती घर चालतं माझी बायको सर्व्हिस करते कार्यकर्त्यांनी गाडी घेऊन दिली आहे तेच डिझेल भरतात हे त्याच्या तोंडुन ऐकताना खुपचं वेगळं वाटतं काही जणांच्या मते बाळासाहेबांनी खुप उशीर केला वगैरे अशा गोष्टी तोंडातुन बाहेर पडतात पण त्यांना सांगावं वाटत की त्यांनी भारीप बहुजन महासंघाचे माध्यमातून 2-3 आमदार निवडुन आणलेत अकोला जिल्हा परिषद कित्येक वर्षे ताब्यात आहे कित्येक नगरसेवक, झेडपी सदस्य बनवलेत हे काही थोडे थोडे आहे का? आणि ह्या सार्‍या सत्तेच्या गोष्टी त्यांनी तेथील अलुतेदार बलुतेदार शोषित वंचित मुस्लिम घटकांना सोबत घेऊन करून दाखवल्यात. आणि बाळासाहेबांच्या अंगातील हेच सर्व समावेश गुणचं आपल्याला न्याय देऊ शकतात हे सर्व प्रथम येथील धनगर समाजाने ओळखले आणि त्यांनीच प्रथम बाळासाहेबांना पंढरपूर या ठिकाणी बोलावून धनगर समाज सत्ता संपादन मेळावा आयोजित केला आणि त्या मेळाव्यातच धनगर समाजाला बाळासाहेबांनी त्याची आजवर इथल्या प्रस्थापितांनी कशी दिशाभूल केली हे त्यांना समजावुन सांगून आपन सत्ता संपादन करुण आपले प्रश्न आपन मार्गी लाउ हा विश्वास धनगर समाजामध्ये निर्माण केला आणि त्यानंतर जेव्हा बाळासाहेबांनी मा. असुवेद्दीन ओवेसी साहेबांच्या एमआय बरोबर युती करून वंचित बहुजन आघाडी ची स्थापन केली तेंव्हा मात्र या महाराष्ट्रात एकच राजकीय भूकंप झाला या वंचित आघाडीने महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उरात धडकी भरवायला सुरवात केली. वंचित बहुजन आघाडी च्या सभांना वाढता प्रतिसाद पाहुन ज्या महाराष्ट्रात लोकसभेच्या 1-2 जागांसाठी प्रस्थापित पक्षाचे उंबरठे झिजवावे लागत असे त्या राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, छगन भुजबळ यांना राजगृहाचा रस्ता धरावा लागला खरचं हा क्षण लाख मोलाचा वाटतो हा क्षण पाहताना आनंद अश्रु अनावर होत होते हा क्षण दलित राजकारणाची उंची वाढवणारा ठरला. तसेच भिमाकोरेगांव प्रकरणात भिडे व एक बोटे यांना अटक करा अन्यथा विधान भवनाला घेराव घालु असा इशारा जेव्हा बाळासाहेबांनी दिला तेव्हा त्यानंतर चे येणारे अधिवेशन हे सरकार ने नागपुरला हलवले ही बाळासाहेबांनी निर्माण केलेली ताकद आहे. तसेच नागपूर येथील जाहीर सभेत आरएसएस चे प्रमुख मोहन भागवत यांना सत्तेत आल्यास याच नागपुरच्या तुरूंगात टाकणार अशी सिंहगर्जना केली RSS वरती अनेक कायदेशीर अभ्यासू प्रश्न मांडले RSS चा बुरखा फाडण्याच काम बाळासाहेबांनी त्या सभेत केलं. RSS ला राज्यघटनेच्या चौकटीत आणावे अशी मागणी केली आणि हीच मागणी कॉंग्रेस ला पचनी पडली नसावी म्हणुनच कॉंग्रेस ने त्यांच्याबरोबर युती केली नसावी. हा घटनाक्रम घडत असताना अनेक tv चॅनेलच्या संपादकांनी, पत्रकारांनी त्यांना खोचक प्रश्न विचारून कोंडी करण्याचा प्रयत्न केला पण बाळासाहेबांनी स्वतःच्या बुध्दीमत्तेच्या जोरावर राजकारणातील प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर विविध इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या संपादकांची बोलती बंद केली. आज महाराष्ट्रात गुगल वरती सर्वात सर्च करण्याच्या यादीत बाळासाहेब अग्रेसर आहेत. आज महाराष्ट्रातील कोणताही बौद्ध,बहुजन युवक हा इंदुमिल, स्मारक, पुतळे या सारख्या भावनिक प्रश्नावरून दुर जावुन आपल्या हक्काच्या सत्तेची मागणी करताना दिसत आहे.. सोलापूर येथे बाळासाहेबांचा अर्ज भरण्यासाठी सोलापुरात उसळलेला अलुतेदार बलुतेदार दलित मुस्लिम शोषित वंचित घटकांचा जनसागर पाहुन बाबासाहेबच प्रत्यक्षात समोर दिसताहेत अशी भावना प्रत्येकाची झाली होती. प्रत्येक युवक, वृद्ध, महिलांना अश्रू अनावर होत होते. सोलापूर येथील जनतेने खरचं एकदा सिद्ध केलं की, सोलापूर जिल्हा भिमाचा किल्ला…… सार्थ अभिमान वाटतो आम्हाला आम्ही सोलापूर जिल्ह्यातील असल्याचा……. जय भिम.. मा.पंकजकुमार काटे जिल्हा सचिव नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *