काळमवाडीच्या श्रीकांत आवताडेची आई समान महिलेस मारहाण…! माळशिरस पोलिस स्टेशनला गुन्हां दाखल…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील काळमवाडी येथील श्रीकांत विठ्ठल आवताडे याने आपल्या आई समान लता तुकाराम माने या वृद्ध महिलेस मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली काळमवाडी येथे घडली आहे.सदर प्रकरणाची पिलीव पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहीती अशी कि फिर्यादी लता माने व आरोपी श्रीकांत आवताडे हे अनेक दिवसांपासून एकमेकांचे शेजारी असून त्यांच्यामध्ये कायम वाद-विवाद चालू असतो व त्याचाच राग मनात धरुन काल श्रीकांत आवताडे याने लता माने यांना तुमचा रोजचाच कालवा असतो त्यामुळे माझ्या मुलांवर परिणाम होत आहे.असे म्हणत श्रीकांतने शिवीगाळ देवून दमदाटी करण्यास सुरुवात केली.यावेळी लता माने यांनी माझा आवाजच मोठा आहे तुम्हांला कशाचा त्रास होतोय का शिव्या देतोय अशी विचारपुस केली असता तुमचे रोजचेच आहे आज तुम्हांला बघतोच म्हणून श्रीकांतने लता माने यांच्या गळ्याला पकडले त्यावेळी लता माने यांनी आरडा-ओरडा करण्यास सुरवात केली व श्रीकांतच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला.तेवढ्यात श्रीकांतने लता माने यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र तोडून घेतले व डोक्याच्या मागच्या बाजूस दगड मारला व लता माने थोड्याच वेळात बेशुद्ध झाल्या.त्यानंतर सदर घटनेची माहीती मिळताच काळमवाडी गावचे माजी सरपंच दादा शिंगाडे व पिडीत महिलेचा मुलगा महेश तुकाराम माने यांनी वेळीच लता माने यांना उपचारासाठी पिलीव येथील डॉ.मदने यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले व लता माने यांना पुनर्जन्म मिळाला.सदर प्रकरणी श्रीकांत आवताडे यांच्यावरती माळशिरस पोलिस स्टेशनला गुन्हां नोंद झाला असुन पुढील तपास पो.ना अभिजीत मोहोळकर करित आहेत.
चौकट:-मला व माझ्या कुटुंबाला श्रीकांत आवताडे याच्यापासून अनेक दिवसांपासून नाहक त्रास होत आहे.व सध्या त्याच्यावर तक्रार दाखल केल्यामुळे तो आमच्यावर चिडून आहे.व त्याच्या पासून आमच्या जिवाला धोका आहे.
महेश माने,काळमवाडी