20 मार्च रोजी केपीजेएस नागरी अर्बनच्या सभासद अर्जाचा शुभारंभ……!
माळशिरस तालुक्यतील केपीजेएस नागरी अर्बन नि.लिमिटेडच्या सभासद करणेस मुंबई येथील कंत्राटदार व केपीजेएस चे संचालक धनाजी मगर यांचे हस्ते शुभारंभ चांदापुरी येथे करण्यात आला .यावेळी संचालक माणिक मगर ,बाळासाहेब जाडकर,बाळासाहेब काटे उपस्थित होते.
यावेळी संस्थापक डॉ कुमार लोंढे म्हणाले आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे याच दिवशी सभासद शुभारंभ करणे म्हणजे हा फार मोठा योग आहे आमच्या संस्थेचा उद्देश लोकांची सावकारी कर्जातून मुक्तता करणे छोटे व्यावसायिक, महिला समाजातील होतकरू तरुणांना स्वताच्या पायावर उभे करणे बचतीची सवय लावून जास्तीत जास्त कर्ज वितरित करणे हेच अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले
मामा मगर,अशोक पाटील,आण्णा भोसले,अरुण बोडरे,दादा लोंढे या भाग्यवान व्यक्तीचे सुरुवातीचे पाच केपीजेएस नागरी अर्बन चे सभासदत्व करून त्यास बहुमान देण्यात आला.
जास्तीत जास्त लोकांनी सभासत्व स्वीकरण्याचे आव्हान डॉ.कुमार लोंढे यांनी केले पिलीव येथे सुसज्ज इमारतीमध्ये एप्रिल महिन्यात भव्य उदघाटन करण्यात येणार आहे..तेव्हा सभासत्व स्वीकारण्यासाठी फक्त एक कॉल खालील नंबर करावा मो.9511772322 अधिक माहितीसाठी अंकुर हॉस्पिटल येथे संपर्क करा