गिते साहेब तुमचा वाढदिवस हा आमच्या सगळ्यांसाठी (आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी) खास दिवस असतो.आता वाढत्या वयाबरोबर त्याचं अप्रूप कमी होत जातं ती गोष्ट वेगळी आहे.खरंतर हा वाढदिवस तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे.त्यामुळे आपण आपल्या वाढदिवसाला कमी लेखू नये हा दिवस आहे आमच्यासाठी जल्लोषाचा आणि तुमच्यासाठी धन्यवाद देण्याचा.मग ते आपल्या घराच्यांबरोबर सेलिब्रेशन करणं असो,कार्यकर्त्यांबरोबर असो वा त्या दिवशी एखादं चांगलं समाजकार्य करणं असो जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही तिचं भाग्य घेऊन पृथ्वीतलावर येत असते परंतु तुम्हीं दलित,आदीवासी व अन्याय ग्रस्तांचे भाग्य उजळून टाकण्यासाठी व त्यांना उर्जा देण्यासाठी पृथ्वीतलावर आला आहे असे म्हणले तर काहीच वावगे ठरणार नाही.वंचित,पिडीत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुरु असलेली खटाटोप,समाजातील तरुणांची मोट बांधण्यासाठी चाललेली धडपड व समाजातील दलालांची दलाली बंद करण्यासाठी चाललेली तळमळ हे सर्व काही पाहून असे वाटते कि या कामांसाठी तुम्हांला जितके आयुष्य लाभले आहे ते कमीच पडेल *म्हणूनच तुम्हांला माझे आयुष्य लाभो* व हि स्वाभिमानी चळवळ अशीच वाढो याच तुम्हांला वाढदिवसाच्या शुभेच्छा व हिच बुध्द चरणी प्रार्थना...!
*सुजित सातपुते*