माढा लोकसभे संदर्भात 31 मार्चला बहुजन ब्रिगेड संघटनेची भूमिका स्पष्ट करणार-समीर साठे
प्रतिनिधी/शिंगोर्णी
फेब्रुवारी रोजी अकलूजमध्ये बहुजन ब्रिगेड संघटनेचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला,वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावाही घेण्यात आला,या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती,या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष किरण साठे उपस्थित होते,अशी माहिती बहुजन ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ समीर साठे यांनी दिली आहे,या मेळाव्याला संबोधित करताना किरण साठे यांनी या मतदारसंघातील स्थानिक उमेदवार ह्या निवडणुकीत असावा असा मनोदय व्यक्त केला होता,
त्याप्रमाणे या माढा लोकसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत, त्यामुळे येत्या 28 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख असून माढा या मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायचा यासाठी येत्या 31 मार्चला या मतदारसंघातील माढा,करमाळा,माळशिरस,सांगोला,माण-खटाव,फलटण,पंढरपूर,या तालुक्यातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांची बैठक अकलूजमध्ये आयोजित केली आहे,या बैठकीत संघटनेची भूमिका जाहीर करण्यात येणार आहे सदर बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ समीर साठे यांनी दिली आहे,