जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसेवस्तीची अनोखी होळी…!

माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी येथील गोडसेवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील केरकचरा गोळा केला. प्लँस्टीक कागद , कचरा, कागदाचे तुकडे ,खराब वैरणीचे ताटे एकत्र करून होळी तयार केली. होळीच्या पवित्र अग्निमध्ये वाईट विचार ,चालीरितींचा, निराशा , दारिद्रय , आळस,खोड्या करणे,भांडण ,अभ्यास न करणे, गैरहजर राहणे, खोटे बोलणे,चोरी करणे अशा विचारांचे दहन करून नायनाट करण्याचे आवाहन केले.तसेच नव्या विचारांचा अवलंब करणे, आई- वडिलांची सेवा करणे , आदर करणे, नोकरी मिळेल इतके शिक्षण घेणे, उच्च शिक्षण घेऊनही शिक्षक, डॉक्टर, वकील , पोलीस, इंजिनिअर इ.होणार असा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी केला . वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून दिले. उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी व होळी विषयी माहिती सांगितली .
या अनोख्या आधुनिक होळीसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सर्जेराव शिंदे सर व श्रीमती.सोनार मॅडम यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी घरीही अशीच होळी करणार असल्याचे सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *