नेपाळहुन बेपत्ता झाला शिगोंर्णीचा विकास साठे…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी गावातील विकास बाळु साठे वय 17 हा नेपाळ देशातील शिगोर्णीचे दुकानदार दिपक जयराम गोडसे यांच्या सोन्या चांदीच्या दुकानातून मे 2018 पासुन बेपत्ता झालेला असुन माळशिरस तालुका पोलिस स्टेशन यांच्या कडे गुन्हा रजिस्टर नंबर 299 दि.02/09/2018 रोजी 363 कलमानुसार गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.विकास साठेचा तपास लागत नसल्याने पोलिस अधीक्षक ग्रामीण सोलापूर, पोलिस उपअधीक्षक अकलूज यांच्या कडे तक्रार देवून हि कुटूबाच्या वतीने वरील कार्यालयाला बेपत्ता विकास ची आई आशा बाळु साठे व भाऊ सागर साठे यांनी हेलपाटे घालुनही कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.म्हणुन माझ्या मुलाचे (विकासचे) काही बरेवाईट झाले.नाही ना अशी शंका विकास ची आई सौ.आशा साठे यांनी व्यक्त केली आहे.
माळशिरस तालुक्यातील शिगोर्णी हे गांव कायम दुष्काळी असुन गावातील 75% पेक्षा जास्त मागासवर्गीय बरोबरच इतर समाजातील कुटुंब किंवा लोक ऊस तोड,विट भट्टी किंवा रोजगार मिळेल त्या ठिकाणी मोल मजुरी करून पोट भरण्यासाठी कुटुंबासह स्थलांतर करतात.केवळ वयोवृद्ध,अंपग व शाळेतील लहान मुले घरी ठेवतात.त्याप्रमाणे शिंगोर्णी येथील मांतग समाजातील विकास बाळु साठे व त्यांचे अंपग वडिल बाळु सोपान साठे,लहान बहिन कांचन साठे याना शिगोंर्णी येथे घरी ठेवून कुटुंबातील सौ.आशा साठे,सागर साठे,लखन साठे,काजल साठे अशी कुटुंबातील काम करणारी माणसे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल कारखान्याच्या ऊसत़ोडणी साठी गेले होते.व नुकतेच लग्न झालेले विकास ची बहिन सुमन तुपे बाळंतपणासाठी आली होती.विकासचे वडिल बाळु साठे यांना दारु पाजुन दिपक जयराम गोडसे यांनी विकास साठे यास नेपाळ मध्ये सोन्या चांदीच्या दुकानात कामाला म्हणुन 12/01/2018 रोजी घेवुन गेला होता.
विकास साठेचा मे 2018 पर्यंत कुटुंबाशी मोबाईल वरून संपर्क होत होता.त्यानंतर गेल्या अद्यापर्यंत संपर्क किंवा फोन आला नाही.त्या दरम्यान दिपक जयराम गोडसे यांचे भाऊकितील नानासाहेब गोडसे व त्यांचे चुलत भाऊ यांनी घरी येऊन बाळु साठे यांना तुमचा विकास नेपाळ हुन कोणालाही न सांगता निघून गेला आहे.याची खाञी करण्यासाठी आम्ही दिपक जयराम गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता.त्यानी विकास निघून गेल्याचे सांगितले.व इतर माहिती व ठावठिकाणा सांगण्यास टाळाटाळ केली‌.विकास साठे हा अल्पवयीन मुलागा असल्याने त्यांची संपूर्ण जबाबदारी दुकानदार दिपक गोडसे यांची असताना दिपक गोडसे हे बेजबाबदार पणाची वक्तवे करित आहेत.म्हणुन दिपक गोडसे यांच्या वर विकास बाळु साठे यांचे अपहरण करून व जाणुनबुजून खोटी माहिती देत असल्याने विकास साठे यांच्या जीवचे बरेवाईट झाले नसेल ना अशी शंका विकास च्या कुटुंबातील सर्वांना वाटत असल्याने अशा प्रकारचा गुन्हा दिपक गोडसे यांच्या वर दाखल करावा.व त्यास तपासासाठी ताब्यात घेऊन त्याचेवर कायदेशीर कारवाई व्हावी‌.
अशी मागणी विकासच्या कुटुंबातील सदस्यांची असुन अन्यथा पिलीव पोलिस स्टेशन समोर संपूर्ण कुटुंब अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या उपोषणास लहुजी शक्ती सेना, रिपाइं,मातंग समाजाच्या विविध संघटनां व कार्यर्कते उपोषणास बसणार असल्याचे आप्पासाहेब लोखंडे,डॉ.समिर साठे,सागर साठे,सागर लोखंडे,बापु ल़ोखंडे आदि कायर्ते यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

चौकट :- याबाबत तापासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या कडे चौकशी केली असता सदर प्रकरण पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे मार्फत महाराष्ट्र पोलिस महासंचालक मुंबई यांचेकडे तपासाकामी नेपाळमध्ये जाण्यासाठी परवानगी मागितली असून परावनगी मिळाल्यानंतर आम्हीं तपासासाठी लवकरच नेपाळला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *