वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष माने-देशमुख व डॉ.अनिरुध्द पिंपळे यांचे अवाहन…!
पिलीव/सुजित सातपुते
आज रविवार दि. १० मार्च २०१९ रोजी आपल्या कुंटुंबातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ मुक्त भारत या तत्वानुसार पोलिओ लसीचा डोस पाजायचा आहे.तरी सर्वांनी आपल्या कु्टुंबातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना जवळच्या पोलिओ बुथवर नेऊन डोस पाजुन घ्यावे असे पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष माने-देशमुख व डॉ.अनिरुध्द पिंपळे यांनी अवाहन केले आहे.सदर लसीकरण मोहीमेचे आज पिलीव गावच्या नूतन उप सरपंच शमशाद शब्बीर काझी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी केशव वाघमारे,आरोग्य साह्यिका बेताळे व्ही.जे,आरोग्य सेविका कोडे आर.जी,शेख के.एच,लोखंडे एस.एम यांसह अनेक मान्यवर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
डोस पाजायचा कोणाला.
१) ०-५ वयोगटातील सर्व बालके.
२) बाळ नुकतेच जन्माला आले असेल तरीही.
3) बाळाला यापुर्वी डोस पाजला असेल तरीही.
४) बाळ किरकोळ आजारीअसेल तरीही.
5) बाहेर गावचे बाळ पाहुणे म्हणुन आले असेल तरीही.
6) ऊसतोड कामगार, वीटभट्टी व स्थलांतरित मजूर, मेंढपाळ यांची मुले.