माढा मतदार संघातून निवडणूक लढणार्या एकुण 31 उमेदवारांची नावे व माघार घेणार्यांची नावे वाचा फक्त पिलीव अपडेटवरती…!
पिलीव/सुजित सातपुते
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची अंतिम यादी स्पष्ट झाली असून सोमवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी एकुण सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.त्यामुळे माढा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात 31 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.तर राष्ट्रीय राज्य व प्रादेशिक पक्षांसह तब्बल वीस अपक्ष उमेदवारही आपलं नशीब अजमावण्यासाठी सज्ज झाले आहे.या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप प्रक्रिया हे मध्यप्रदेशचे आयएएस अधिकारी रवींद्र यांच्या उपस्थितीत व निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे जिल्हा माहिती अधिकारी राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील क्षेत्रीय प्रचार व प्रसार अधिकारी अंकुश चव्हाण उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहल भोसले यांच्या उपस्थितीत पार पडले आहे. 28 एप्रिल ते चार एप्रिल हा माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता या कालावधीत 42 उमेदवारांनी 52 अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे दाखल केले होते पाच एप्रिल रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया होती या छाननी प्रक्रियेत पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते त्यामुळे 37 उमेदवार छाननी प्रक्रिया अंती निवडणुकीत सज्ज झाले होते सोमवार 8 एप्रिल हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता या माघार घेण्याच्या दिवशी सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. आता माढा लोकसभेसाठी 31 उमेदवारांची नावे फायनल झाली असून 20 अपक्ष उमेदवारही आपला नशीब आजमावणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यात विभागला गेला असून माढा करमाळा सांगोला माळशिरस यासह सातारा जिल्ह्यातील माण फलटण या भागाचाही यामध्ये समावेश आहे.
यांनी घेतला माघार
सह्याद्री सुरजी राव ऊर्फ चिमणराव कदम फलटण, बशिरह्मद भाषा मिया शेख सोलापूर विठ्ठल नांदेड ठावरे माढा अशोक वाघमोडे करमाळा रामचंद्र गायकवाड पंढरपूर दिनकर शिवाजी देशमुख प्रभाकर देशमुख
प्रमुख पक्ष व त्यांना मिळालेले चिन्ह
… आता लोकरे बहुजन समाज पार्टी हत्ती, रणजीत सिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर भाजपा कमळ, संजय मामा विठ्ठलराव शिंदे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी घड्याळ, नवनाथ भीमराव पाटील हिंदुस्थान प्रजा पक्ष ब्रीफकेस,नानासाहेब यादव भारतीय प्रजा सुराज्य पक्ष सिलेंडर, ब्रह्मकुमारी प्रमिला बेन अखिल भारतीय जनता पार्टी शिट्टी,मारुती केसकर बहुजन आघाडी पार्टी कपबशी,रामचंद्र घुटुकडे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी एसी, एडवोकेट विजयराव मोरे वंचित बहुजन आघाडी चावी,शहाजान शेख बहुजन महाराष्ट्र पार्टी मोजे,सुनील जाधव बहुजन मुक्ती पार्टी खाट
अपक्ष ची नावे व मिळालेली चिन्हे
.अजिनाथ केवटे टेबल, अजिंक्य साळुंखे लेडीज पर्स, अण्णा म्हस्के बॅटरी टॉर्च, सिद्धेश्वर आवारे काडीपेटी दत्तात्रय खटके ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी दिलीप जाधव झगा दौलत शितोळे तंबू नंदू मोरे हॉलीबॉल मोहन राऊत ट्रक रामदास माने पेन निब, रोहित मोरे दूरदर्शन विजय माने देशमुख बॅट एडवोकेट शिंदे डिझेल पंप विश्वंभर काशीद टेलर सचिन जोरे ऑटोरिक्षा सचिन पडळकर ऊस शेतकरी सविता ऐवळे कपाट संतोष बिचकुले हेलिकॉप्टर संदीप खरात अंगठी संदीप पवळ पोळपाट लाटणे
जिल्ह्यात आचारसंहिता भंगप्रकरणी तीस जणांवर गुन्हे दाखल
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आचारसंहिता भंगप्रकरणी तीस जणांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक i मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे 28 जणांचे चार्जशीट कोर्टात सादर केले असल्याचेही मनोज पाटील म्हणाले.