अखेर माढ्याचा तिढा सुटला…!

पिलीव/सुजित सातपुते
अर्ज दाखल करण्याची तारीख तोंडावर आली तरी माढा मतदार संघातील भाजपा चा उमेदवार आज पर्यंत निश्चित झाला नव्हता त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राचे माढा मतदार संघावरती लक्ष लाघून राहीले होते.परंतु आज अखेर माढ्याचा तिढा सुटला असून भाजपाकडून माढा लोकसभा मतदार संघासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपामध्ये दाखल झालेले रणजितसिंह मोहिते-पाटील यांना डावलण्यात आल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.रणजितसिंह मोहिते-पाटील हे माढा मतदार संघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत.माढा लोकसभा मतदार संघामध्ये करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस या तालुक्यांसह पंढरपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे.त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील फलटण,माण,खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील गावांचा समावेश आहे. या उत्तर-पूर्व भागांत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची आता चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे खासदार तथा माढ्यातील मातब्बर नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. या नंतर भाजपानं काँग्रेसला मोठा धक्का दिला होता.दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.खरं तर तेव्हांच त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं.रणजितसिंह मोहीते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता.तेव्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. रणजितसिंह यांच्या पक्ष प्रवेशावेळी मोहिते-पाटील कुटुंबाचा मान राखला जाईल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी तसे संकेतही दिले होते.विशेष म्हणजे भाजपाबरोबर असलेल्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीची वाट धरून उमेदवारी मिळवली. त्यामुळे रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा संजय शिंदेंशी जंगी सामना होणार आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे पुत्र आहेत.त्यामुळे त्यांना वडीलांनी केलेल्या समाजकार्याचा नक्कीच फायदा होईल असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *