बापु लोंढे यांची राष्ट्रवादीच्या सा.न्या.विभाग सरचिटणीसपदी निवड…!

खुडूस/प्रतिनीधी

खुडूस गावचे युवा नेते फुले-शाहु-आंबेडकर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  बापु लोंढे यांची राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सरचिटणीसपदी निवड झाली असुन आंबेडकरी चळवळीतील सक्रीय युवा नेतृत्व म्हणुन ते परीचित असुन अनेक वर्ष फुले-शाहु-आंबेडकर विचारधारेच्या माध्यमातुन अनेक सामाजिक कामे त्यांनी केली आसुन येत्या 2 फेब्रुवारी रोजी खा.विजयसिंह मोहीते पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त व रीपाइं नेते नंदकुमार केंगार यांच्या वाढदिवासानिमित्त खा.विजयदादांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र दिले जाणार असल्याचे समजते 

बापु लोंढे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने अनेक राजकीय जाणकरांच्या भुवया उंचावल्या असुन काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.परंतु खा.विजयदादा व पंचायत समिती सदस्य अर्जुनदादांच्या विश्वासावर भरोसा ठेवुन पक्षाबरोबर आंबेडकरी चळवळही चालु ठेवणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले व यापुढे सक्रीय सहभाग घेउन आगामी निवडणुकीत तरूणांची फौज घेउन उतरणार असल्याचे सांगित.ले

Sent from my Samsung Galaxy smartphone.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *