आत्ता राजाभाऊ विकासदादांनाच जिल्हाध्यक्ष करणार ?

पिलीव/सुजित सातपुते
रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाचे (आठवले गट) सोलापूर जिल्हाध्यक्ष आशोक सरवदे यांनी सोलापूर जिल्ह्यात कोणाला विश्वासात न घेता परस्पर बैठका घेवून पक्षाविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याची घोषणा राज्य उपाध्यक्ष के.डी कांबळे यांनी राज्य सचिव तथा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीत केली आहे.त्यामुळे आत्ता ऐन निवडणूकीच्या तोंडावर रिपाइंत एक मोठी दरी निर्माण झाली असून दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ होणार म्हणजे रिपाइं पक्षात काम करणारे तरुण कार्यकर्ते दुसर्या पक्षात प्रवेश करतील हे मात्र नक्की परंतु जर हे रोखायचे असेल तर त्याला पर्याय म्हणजे राजाभाऊ सरवदे यांनी माळशिरसचे”विकासदादा धाईंजे”यांच्या खांद्यावर सोलापूर रिपाइं जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देणे गरजेचे आहे.असे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ पदाधिकार्यांसह तरुण कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.त्याला कारणच असे आहे कि एके काळी विकासदादा माळशिरस तालुकाध्यक्ष असताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यासह अखंड महाराष्ट्रामध्ये माळशिरस तालुका आंबेडकरी चळवळीमध्ये अग्रेसर करुन दाखविला होता.माळशिरस तालुक्यातील 112 गावातील निस्वार्थी तरुणांची एक मजबूत फळी तयार करुन एक स्वाभिमानी चळवळ त्यांनी उभी केली होती.त्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले व राज्य सचिव राजाभाऊ सरवदे यांचेकडून अनेकवेळा विकासदादांचे कौतुक ही झाले आहे.परंतु पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात पक्षांतर्गत हेवेदावे निर्माण झाल्याने थोड्याच दिवसात होत्याचे नव्हते झाल्यासारखे झाले आणि”एक ना धड अन् भारा भर चिंध्या”अशी पक्षासह कार्यकर्त्यांचीही अवस्था झाली होती.तरीही कोणत्याही लालसाला बळी न पडता आपल्यां अंगी निस्वार्थी चळवळीचे सामर्थ्य बाळगून आज अखेर विकासदादांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून आपली चळवळ व पक्षाचे काम अविरतपणे चालू ठेवले आहे व पुन्हां एकदा त्याच जोमाने तरुण कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केली असून तालुक्यामध्ये निस्वार्थी आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली आहे.त्या मुळे राजाभाऊ सरवदे आत्ता”विकासदादांनाच” जिल्हाध्यक्ष करणार असे माळशिरस तालुक्यासह अखंड सोलापूर जिल्ह्यातील रिपाइंच्या पदाधिकार्यांसह तरुण कार्यकर्त्यांमध्ये चर्चिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *