कै.अमोल पिसे इंग्लिश मेडियम स्कुल पिलीव येथे बालकानी भरविला आनंदीबाजार
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील श्रीमती किसाबाई शंकर सरगर बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित कै.अमोल पिसे इंग्लिश मेडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्कुलच्या आवारात संस्थापक अध्यक्ष, प्रा.सागर सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदीबाजाराचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना बाजारातील व्यवाहाराची माहिती मिळावी,देवाण घेवाणीच्या व्यवाहाराची माहिती व्हावी म्हणून आनंदी बाजार भरविला होता. यावेळी प्राचार्या अंजली उपाध्ये व सर्व शिक्षक,कर्मचारी वर्ग यानी परिश्रम घेतले व पालकांनी बाजारातील भाजीपाला व इतर वस्तूंची खरेदी केली.