हिंदू जनजागृती समितीच्यावतीने पिलीव औट पोस्टला निवेदन….!
पिलीव/सुजित सातपुते
येत्या रंगपंचीमीला व होळीच्या सणादिवसीचा सण साजरा करताना होळीला बोंबलने, होळी पेटवून मालमत्तेचे नुकसान करणे रसायनमिश्रीत रंग लावणे,चेहर्याला जबरदस्तीने चमकी अथवा रंग लावणे तसेच महिलांची छेड काढणे यामूळे गावातील शांततेचा भंग होऊन भांडण मारामार्या होतात,गटतट निर्माण होतात.तसेच होळीच्या दिवशी,धुलवडीच्या नीमित्ताने दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी अश्लिल हावभाव,अश्शील शिव्या देने ,तोंडाला काळे फासने, कचऱ्याची होळी करणे, अशा गोष्टीं टाळण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पिलीव पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.हिंदू जनजागृती समिती दर वर्षी जनप्रभो धन मोहीम राबविते व हिंदू धर्मातील चालीरीती प्रमाणे चुकीच्या पद्धतीने सण साजरे केले जातात त्यांना हिंदू धर्मातील धर्म शास्त्राप्रमाणे व आधुनिक विज्ञानाची सांगड घालून हिंदूंनी आपले सण देश हित व देश प्रेम संस्कृतीचे जतन करुन महिलांची सुरक्षितता आणि धार्मिक पावित्र्य राखून साजरे करावेत असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पिलीव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे व निवेदनात नमूद केल्या प्रमाणे अनुचित प्रकार अधार्मिक कृत्य हिंदूंच्या देव देवतांची विटंबना होणार नाही यासाठी कायदेशीर सहकार्य व्हावे अशी विनंती केली आहे.सदरचे निवेदन पिलीव औट पोस्टचे पोलीस नाईक अभिजित मोहोळकर यांना देण्यात आले.यावेळी राहूल मदने, रमेश पिसे, योगेश देशमुख, विजय सगरे, विठ्ठल करांडे, विकास पिसे, रणधीर काटे, मंगेश वाघमारे, निलेश पिसे ,गणेश गोडसे मान्यवर उपस्थित होते.