पिलीव येथे बंद घराचे कुलुप तोडुन रोखड व सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर असणार्या केशव महादेव वाघमारे यांच्या मालकीच्या घरात राहणारे भाडेकरू कल्लापा धर्मान्ना खांडेकर व त्यांच्या पत्नी सौ.संतोषी खांडेकर या आचेगाव ता.दक्षिण सोलापूर येथे नातेवाईकाच्या विवाह कार्यासाठी घराला कुलुप लावून दि.7.3.2019 रोजी गेल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटीतील लॉकर तोडून दि.9. 3.2019रोजी रात्री उशिरा रोख रक्कम रू.32000 व सोन्या चांदीचे दागिने रू.27500. कीमतीचे चोरून नेले आसल्याची फिर्याद पिलीव पोलीस ठाण्यात दिली आहे.त्यानूसार घटनास्थळाचा पंचनामा पो.नि.विश्वंभर गोल्डे,उपनिरिक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली, हवालदार अभिजीत मोहोळकर,स्वप्निल गायकवाड,जगताप यांनी करून अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.तसेच त्यांच्या शेजारी राहणारे प्रशांत विनायक चंदनशिवे यांच्याही बंद घराचे कुलुप तोडून रू.5 000.रक्कमेची चोरी झालेचे निष्पन्न झाले तर गावात आणखी काही ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत मात्र लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या नाहीत.सदर घटनेचा पुढील तपास पो.नाईक सुरेश गावडे हे करीत असून वारंवार होणार्या चोर्या व घरफोड्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.