पिलीवचे नूतन सरपंच नितीन माळी यांनी स्विकारला पदभार…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काल जहागिरदार पार्टीच्या सौ.शमशाद शब्बीर काझी यांची निवड करण्यात आली.तसेच जनतेतून निवडूण आलेले नूतन सरपंच जहागिरदार पार्टीचेच नितिन विठ्ठल माळी यांनी सरपंचपदाचा कार्यभार स्विकारला.दि.26.9.2018रोजी सार्वत्रिक निवडणूअ होऊन राष्ट्वदी काँग्रेस पुरस्क्रत जहागिरदार पार्टीने सरपंचपदासह17पैकी.9जागा जिंकून बहूमत मिळविले होते.विद्यमान बॉडीची.दि.25.2.2019 रोजी मुदत संपत असलेने, उपसरपंचपदाच्या निवडी साठी सरपंच नितिन विठ्ठल माळी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्विचीत सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंचपदासाठी,सौ.शमशाद शब्बीर काझी, संजय मल्लिकार्जून आर्वे, यांनी जहागिरदार पार्टीच्यावतीने तर नागरीआघाडीच्यावतीने, राजेंद्रसिंग जामदार, व संतोष बगाडे यानी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर सर्वच अर्ज मंजूर झाले नंतर, संजय आर्वे.व, संतोष बगाडे यानी माघार घेतली.सौ.शमशाद काझी व राजेंद्रसिंग जामदार यांच्यात निवढणूक होऊन,सौ.शमशाद काझी याना17पैकी.9मते मिळालेने, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सौ.शमशाद काझी यांना विजयी घोषित केले.मतदानापूर्वी आंगणवाडी सेविका सौ.वैष्णवी गुजरे, आशासेविका, सौ.ज्योती फाळके याना अपात्र ठरवावे असा तक्रारी अर्ज, संग्राम पाटील, राजेंद्रसिंग जामदार यांनी तर सौ.सुषमा जामदार यांनी राजेंद्रसिंग जामदार यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केलेने त्यांचेही सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली होती.या सर्व हारकती फेटाळण्यात आल्या.यावेळी ॲड, मानसिंह जहागीरदार व ॲड, सत्यजित गलांडे यांनी जहागीरदार पार्टीच्या वतीने युक्तिवाद केला, निवडणूक प्रक्रिया सकाळी१०वाजता सुरु होऊन निवडीचा निर्णय होण्यास५-३० वाजले, सर्वांचे तक्रारी अर्ज फेटाळून लावून गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले.यावेळी जहागीरदार पार्टीच्या सौ, वैष्णवी संतोष गुजरे गैरहजर राहिल्या, यावेळी नूतन सरपंच नितीन माळी, संतोष बगाडे, राजेंद्र जामदार, संजय आर्वे ,ज्योती फाळके, संग्राम पाटील, गणेश लोखंडे, सौ, प्रियांका जाधव, जिवन गोरे, सौ, शबाना पठाण, सौ सुजाता सातपुते, सौ, सोनाली करमाळकर ,सौ, शमशाद काझी, दत्तात्रय बोडरे, सो, सुजाता देशमुख, सो, सुषमा देवी जामदार,चंद्रकांत पिसे ,असे१६सदस्य व१सरपंच सदस्य नितीन माळी यांनी आपल्या मतदानाचा विशेष अधिकार बजावला त्यामुळे१७पैकी९मते मिळाल्याने उपसरपंच पदी सौ, शमशाद शब्बीर काझी यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले, यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच नितीन माळी निरीक्षक म्हणून माळशिरस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रावण घाडगे व ग्रामविकास अधिकारी अनिल सावळजकर यांनी काम पाहिले त्यांचे लेखनिक सोमनाथ देशमुख सुदर्शन महामुनी यांनी सहाय्यक म्हणून काम केले, निवडीनंतर माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार, जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील यांनी नूतन सरपंच व उपसरपंच यांचा यथोचित सन्मान करून शुभेच्छा दिल्या, गावातून मिरवणूक काढण्यात येऊन सर्व सदस्यांचे कार्यकर्त्यांचे नूतन सरपंच व उपसरपंच यांनी आभार मानले तर पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे ,उपनिरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव पोलीस दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.