पिलीव येथे विविध उफक्रम राबवून गणेश जयंती उत्सव साजरी…!
पिलीव अपडेट/टिम
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे संग्राम दोस्ती मंडळाच्यावतीने परंपरेप्रमाणे विविध उपक्रम राबविण्यात येऊन भक्तीमय वातावरणात गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी पिलीवचे जेष्ठनेते शरद कालेकर यांचे हस्ते रूद्राभिषक विधीपूर्वक संपन्न झाला. पिलीवच्या भजनी मंडळानी भजनाचा कार्यक्रम सादर केला, व दुपारी बारा वाजता फूले टाकण्याचा समारंभ संपन्न झाला. यावेळी सौ.मीनाक्षीदेवी देशमुख यांनी गणेश जन्माचा पाळणा गाऊन सादर केला. तसेच कवठेमहंकाळ येथील ह.भ.प.शिवाजीमहाराज कुंभार यांनी श्री गणेशाच्या जन्मावर विविध प्रकारच्या कथा सांगितल्या यावेळी त्यांनी संग्राम दोस्ती मंडळ स्थापनेला50वर्षे पूर्ण झाली आणि मंडळ फक्त गणपती उत्सव साजरा करतात असे नाही तर सामाजिक कार्य करीत आहे, गोरगरीब विद्यार्थ्याना शालेय साहित्य, अर्थिक मदत करते व या मंडळात सर्व जात़ीधर्माची मंडळी एकत्रित कार्य करतात ही खरी ओळख, व धार्मिक एकतेचे खरे प्रतीक या ठिकाणी दिसत आसल्याने समाधान व्यक्त करून कार्यकर्त्यांचे कौतुक आपल्या ओघवती कीर्तंनातुन केले व उदाहरणे देत भक्ताना तल्लीन करून, धार्मिक वातावरण निर्माण केले होते. यावेळी उपस्थिताना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.दर्शंंनासाठी भक्तानी गर्दी केली होती. यावेळी सरपच संग्राम पाटील, डाँ.मिलींद गुळभिले,,अरिफखान पठाण, दत्तात्रेय भैस, सचिन पुकळे याकुब सय्यद अनिल कालेकर, नानासाहेब देशमुख, शरद कालेकर ,दादासाहेब शिंगाडे, कदिर पठाण आदि मान्यवर उपस्थित होते. जयंती उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष सालार पठाण, नटवर पठाण, शशिकांत लोखंडे, युवराज गायकवाड, रणजित काळे, अतुल भैस, संतोष खेत्रे, शकील शेख, सुरज कस्तुरे, योगेश सुतार, विजय मदने, सुरज मोरे, कीसन जामदार, महादेव वाघमारे यांनी व इतर अनेक कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले आहे.