खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या हस्ते श्री व सौ डॉ.पवार यांचा सत्कार…!

पिलीव।वार्ताहर।
सोलापूर जिल्हा स्तरावर झालेल्या महिलांच्या मँरेथान स्पर्धैत माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील डॉ. सौ.वंदना पवार यानी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला तसेच पूरूष मँरेथान स्पर्धेत सहावा क्रमांक मिळविल्याबद्ल या दाम्पत्यांचा सन्मान, माढा लोकसभेचे खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी, माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार, जि.प.सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील, सरपंच सौ.आरती मगर, माजी सरपच हाणमंराव मगर दादानाना मगर, अर्जूनसिंह मोहिते पाटील, गणेश पाटील उपस्थित होते.यावेळी बोलताना संग्रामसिंह जहागिरदार म्हणाले की पवार दाम्पत्त्यांनी पिलीव व निमंगाव या दोन्ही गावाचे नाव ऊज्वल केले असून तालुक्याचेही नाव रोशन केले आहे.तर खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी डॉ.पवार दाम्पत्यानी व्यवसाय सांभाळून मिळविलेले यश इतराना प्रेरणा देणारे एकमेव उदाहरण आहे असे सांगितले.यावेळी हरिभाऊ मगर व डॉ.दिलीप पवार यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *