सावित्रीच्या लेकी उद्याचा भारत घडवतील –डॉ.पंचशीला लोंढे

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे सोशल संस्था,सदाशिवदेठे निवासी प्रशाला अँड ज्यु .कॉलेज,डायमंड इंग्लिश स्कूल वतीने जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.पंचशीला लोंढे म्हटले की” राष्ट्राच्या व समाजाच्या जडणघडणीत महिलांचा स्थान महत्वपूर्ण आहे,आणि या कॉलेजच्या सावित्रीच्या लेकी उद्याचा भारत नक्की घडवतील याकरिता जन्माला येणारी मुलगी वाचली पाहिजे,स्त्री पुरुष समानता अंगिकरून महिलांवरील अन्याय,अत्याचार,लैंगिक छळ,कौटुंबिक हिंसा,जुनाट चालीरीती परंपरा यास मूठमाती देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन व्यक्त केले.
यावेळी जागतिक महिला दिनी निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,लिंबू चमचा,संगीत खुर्च्या,बेडूक उड्या, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या दिवसाचे महत्व ,इतिहास याची सुरेख माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी मुलांना दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.के साठे यांनी केले.तर आभार प्रा.नितीन सरक यांनी मानले यावेळी डी. लोंढे,प्रा.दीपक काटे,नमिता म्याडम,आर्शिद पठाण इ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *