“जल्लोष युवा मनाचा” वार्षिक स्नेहसंमेलनात सदाशिव देठे व डायमंड इंग्लिश स्कूल च्या दीडशे कलाकारांचा अभूतपूर्व सहभाग….!!!!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे ‘सोशल ‘ संचलित सदाशिव देठे निवासी प्रशाला अँड ज्यु कॉलेज व डायमंड इंटरण्यष्णल इंग्लिश स्कूल यांच्या वतीने “जल्लोष युवा मनाचा” वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम दीडशे कलाकारांच्या नृत्यअविष्काराने संपन्न झाला
यावेळी सुरुवातीस प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ लेखक,विचारवंत बा.न धांडोरे ,पंचायत समिती माजी सदस्य के.के पाटील,प्रजा सुराज्य चे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ राऊत,ऑडिटर चेरमन अशोकराव तडवळकर,संस्थापक डॉ.कुमार लोंढे ,रिपाइंचे सोमनाथ भोसले,उद्योजक विनायक मासाळ,मुस्लिम समाज नेते आरीफभाई पठाण इ. च्या हस्ते केले .”जल्लोष युवा मनाचा”या विशेषांकचे प्रकाशन मोठ्या दिमाखात करण्यात आले.हिंदी,मराठी,रिमिक्स,लावणी….तुला फिरविण गाडीवर ….लंडन देखा ….आमदार झाल्यासारखं वाटतंय अशा गाण्यांवर सदाशिव देठे निवासी प्रशाला अँड ज्यु कॉलेज चांदापुरी ,डायमंड इंग्लिश स्कूल च्या दीडशे कलाकारांनी उपस्थित गर्दीस मंत्रमुग्ध शिट्या ,टाळ्या व बक्षिसांची लयलूट करून ग्रामीण भागातील मुले ही अभिनय ,नृत्य क्षेत्रात पाठीमागे नाहीत हे अधोरेखित करून दाखविले.
यावेळी कोल्हापूर येथील उद्योजक वासूबाबू चिंताला यांना ‘उद्योजकता पुरस्कार’,मोहमानंद ओव्हाळ महाराज यांना ‘समाज परिवर्तन पुरस्कार’,हसन बाशा यांना युवा उद्योजक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला .यावेळी डॉ.कुमार लोंढे म्हणाले “शाळा ,शिक्षण ,सर्जनशीलता आदी बाबतीत विद्यार्थी वर्गाणी दक्ष राहून शेतात राबणाऱ्या माता पित्याचे स्मरण करावे व भोंदू बाबांचा आदर्श घेण्यापेक्षा महापुरुषांचा आदर्श घेणे महत्वाचे आहे” मोहमानंद महाराज म्हणाले या शाळेकरिता मी सर्वोत्तपरी मदत मठाकडून देण्यास तयार आहे.दशरथ राऊत,हसन बाशा,वासुबाबू चिंताला यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाले “मी स्पर्धा परीक्षेची शंभर पुस्तके देणार आहे आणि शाळा,शिक्षक,पालक यांनी एकदिलाने मदत केल्यास शाळा मोठी होईल हा आशावाद व्यक्त केला
बारावी परीक्षेत यश
मिळवलेले आरती देठे,नमिता लोंढे ,काजल मगर इ चा सत्कार केला तर तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत,रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा,मेहंदी स्पर्धा,वक्तृत्व ,म्यारेथॉन इ स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्वांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले
सदर कार्यक्रमास बीएमपी चे सचिव रवी सर्वगोड,पंचायत सदस्य अजय सकट,एमआयएम चे ऍड दादासाहेब पांढरे,रिपाइंचे मिलिंद सरतापे,वंचित चे भैय्या बाबर रासपचे दत्ता कोकरे,पंढरपूर पत्रकार संघाचे अपराजित सर्वगोड,चांदपुरीचे माजी सरपंच भजनदास चोरमले ,द्रौपदी कवळे लोकमतचे एल डी वाघमोडे,गारवडचे माजी सरपंच नानासाहेब मगर ,पठाणवस्ती माजी सरपंच रशीद पठाण,मेहबूब पठाण,तरंगफळ चे माजी उपसरपंच शशी साळवे,शिवराज पुकळे, लहू लोंढे ,एजाज पठाण ,जयवंत सुळ संस्थेच्या विश्वस्त डॉ.पंचशीला लोंढे इ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.के साठे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.सरक,साठे म्याडम यांनी केले तर आभार प्रा.काटे यांनी मानले