सर्जेराव शिंदे सरांचे शैक्षणिक कार्य उत्कृष्ट व कौतुकास्पद – गटशिक्षणधिकारी धनंजय देशमुख
पिलीव/प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसेवस्ती येथे फेब्रुवारी 2020 महिन्याची 28/ 2 /2019 वार- शुक्रवार रोजी शिक्षण परिषद प्राथमिक उत्साहात व उत्कृष्ट झाली.शिक्षण परिषद या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श गटशिक्षणाधिकारी दौंदे पुरस्कार सन्मानित माननीय श्री. धनंजय देशमुख साहेब आदर्श गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माळशिरस व प्रमुख पाहुणे माननीय श्री. महालिंग नकाते साहेब कर्तव्यदक्ष विस्ताराधिकारी बीट पिलीव, माळशिरस तालुक्यातील सरपंच संघटनेचे कार्यशील अध्यक्ष माननीय श्री. सचिन पाटील फळवणी, श्रीमती शैलजा जाधव मॅडम केंद्रप्रमुख कोळेगाव ,गोडसे वस्ती शाळेचे माजी मुख्याध्यापक गोडसे गुरुजी व कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक माननीय श्री. शंकर गोडसे सर शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इंजिनिअरिंग कॉलेज अकलुज तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रघुनाथ गोडसे शिंगोर्णी ग्रामपंचायत सदस्य श्री. औदुंबर काळेल ,श्री. कलाप्पा मुंजे, श्री दर्याप्पा गोडसे, सौ.सीमा काळेल,गौतम आटपाडकर, राजेंद्र काळेल, दादासो मुंजे, बाजीराव शिंदे,श्री विजय मुंजे, दिपक गोडसे,व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक व कोळेगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद या सर्वांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसे वस्ती व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
मा. श्री देशमुख साहेब मा. श्री नकाते साहेब माननीय श्री सचिन पाटील श्रीमती जाधव मॅडम केंद्रप्रमुख मुख्याध्यापक श्री सर्जेराव शिंदे, श्रीमती सोनार मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रघुनाथ गोडसे, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर काळेल, कलाप्पा मुंजे, गोडसे, गुरुजी व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेतील शिक्षण परिषदेचे व सोलर सिस्टिम ई लर्निंग सुविधा यांचे उद्घाटन केले तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव शिंदे सर यांनी प्रस्ताविक केली शाळेतील भौतिक सुविधा व शाळेतील राबवलेले उपक्रम सांगितले यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसे वस्ती ची स्थापना 1967 असून श्री बाबुराव गोडसे गुरुजी यांनी सुरुवात केली. शाळा बंद पडण्याच्या स्थितीत होती शाळेचा कायापालट केला शाळेचा पट 16 वरून 51 केला त्यानंतर शाळेमध्ये लोकसहभाग अडीच लाखाच्या पुढे,
सोलर सिस्टिम असणारी जिल्ह्यातील पहिली शाळा आहे,शाळेची उत्कृष्ट रंगरंगोटी, शाळेचा पट एका वर्षात 51केला, उपस्थिती 95% च्या पुढे ,शाळा सिद्धी मध्ये शाळा अ श्रेणी, शाळेत मल्लखांब सुविधा आहे, शाळा प्रगत शाळा आहे ,मैदान सपाटीकरण त्यात माती भरणे,चार पाडून वृक्षारोपण केले, मैदान जेसीबीने चाळुन तयार केले,वृक्षारोपण केले, शाळेत गॅस सुविधा , शाळा डिजिटल , शंभर टक्के विद्यार्थीना गणवेश ,सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश, हँडवॉश स्टेशन तयार केले,उत्कृष्ट परसबाग ,दोनशे सीड बॉल निर्मिती, शैक्षणिक सहल, क्षेत्र भेट, वनभोजन, पाण्याची सुविधा,स्टेज बांधले, वाळलेल्या व टाकाऊ झाडाच्या बुंध्यापासून 700 रुपयांमध्ये चार ते पाच हजाराचा उत्कृष्ट व आकर्षक असा डायस तयार केला, विद्यार्थ्यांसाठी दोन स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही खरेदी केले ,शाळेत सिस्वा, सिंगलबार ,डबलबार, घसरगुंडी, झोका, YouTube चैनल, स्पर्धा परीक्षा अक्षरगंगा ,मंथन ,टी एस ई, शाळेत मतदान जनजागृती,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, संगीत खुर्ची, कागदी टोपी बनवणे, आकाश कंदील बनवणे,किल्ला तयार करणे, भेटकार्ड तयार करणे, पणती पेंटिंग, शाळेत कॅरम सुविधा, शाळेत बुद्धिबळ खेळाची सुविधा, उडीद दोर, फुटबॉल, खो खो मैदान, कबड्डी मैदान, शाळेत हँडवॉश तयार केले व त्याचा दैनंदिन वापर,स्वच्छ शाळा सुंदर शाळा,शाळेत वाटर हार्वेस्टिंग सुविधा, शाळेला क्रीडा स्पर्धांमध्ये व टॅलेंट हंट स्पर्धेमध्ये आतापर्यंत 18 प्रशस्तीपत्रक मिळाली ,शाळेत अनोखी होळी चे आयोजन, शाळेतील विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन, आरोग्य तपासणी अशा विविध भौतिक सुविधाने पूर्ण असलेली व उपक्रमाने गजबजलेली गोडसेवस्ती शाळा.
तदनंतर क्रीडा स्पर्धेमध्ये व टॅलेंट हंट स्पर्धे मधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला, नाटक स्पर्धेतून विद्यार्थ्यांना मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून 100व200 पानी वही व पेन सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरां च्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याच्यानंतर प्रितम नवनाथ धांडोरे याची सैनिक स्कूल साठी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार केला व वाघडोह शाळेच्या राबिया शेख मॅडम कर्मचारी स्पर्धेमध्ये भालाफेक तृतीय क्रमांक मिळवला त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
शाळेने आपल्याला घडवलं चला आपण शाळा घडवूया या उक्तीप्रमाणे कार्य केलेल्या मान्यवरांसाठी गोडसे वस्ती शाळेने शिंगोर्णी रत्न हा पुरस्कार सन्मान पत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. ते मान्यवर त्यांचं कार्य खालीलप्रमाणे-
सोलर सिस्टिम 35600
डॉ. संजय काळेल, औदुंबर काळेल, रावसाहेब मुंजे, सौ निता काळेल, तुळशीराम गोडसे ,बंडू बाड ,गौतम आटपाडकर ,दादासो मुंजे, सर्जेराव शिंदे व शाळा व्यवस्थापन समिती गोडसे वस्ती
शाळा रंगरंगोटी 27300
सोमनाथ गोडसे ,नवनाथ रानगट ,कलाप्पा मुंजे ,अशोक मुंजे ,सर्जेराव शिंदे ,सोनार मॅडम.
मैदान दुरुस्ती व सपाटीकरण आणि चार पडणे व वृक्षारोपण 8000
औदुंबर काळेल ,शरद गोडसे, मिथुन गोडसे
माईक व साऊंड सिस्टिम 9000
रघुनाथ गोडसे
स्टेज बांधणे 6000
दर्याप्पा गोडसे
संस्कृतिक कार्यक्रम 13500
शाळा व्यवस्थापन समिती सर्व पालक व आधार प्रतिष्ठान ग्रुप
- विकास कस्तुरे 1000
फुटबॉल आणि चेस सेट
*प्रताप काळेल 3454
क्रीडा साहित्य ढोल ,हलगी, झांज ,ताशा.
*हॅन्ड वॉश स्टेशन* 1000
राजेंद्र काळेल
मल्लखांब व खोखो पोल 1000
सुभाष काळेल
कॅरम उडी दोर चेस सेट
1500
श्री सर्जेराव शिंदे सर
स्मार्ट ,अँड्रॉइड 32 इंच् टीव्ही 14000
डॉ.संजय काळेल,दीपक गोडसे ,अवचित दगडे
स्मार्ट ,अँड्रॉइड 32 इंच् टीव्ही 14000
डॉ. दिलीप पवार(पिलिव),श्री सचिन मुंजे,श्री शहाजी महाडिक सेठ(बक्षीस1000)
सिस्वा 4000
बाजीराव शिंदे, भारत काळेल
झोका 8000
आबासो मुंजे ,सत्यवान पिसे
शहाजी शिंदे ,धनाजी शिंदे
घसरगुंडी 12000
श्री रघुनाथ गोडसे,राजेंद्र काळेल, विजय गोडसे, प्रकाश काळेल, बाळासाहेब गोडसे
राज्यस्तरीय नाटक स्पर्धा दुतिय क्रमांक बक्षीस 3000
सर्व विद्यार्थी शंभर-दोनशे पानी वही व पेन वाटप व रेफरी खर्च
खोली क्रमांक 3 पत्रा बसवणे 60000 ते 70000
श्री महेश शिंदे आर्किटेक गोंदवले सातारा
आतापर्यंत 250000 च्या पुढे लोकसहभाग.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श गटशिक्षण अधिकारी माननीय श्री धनंजय देशमुख साहेब यांनी सर्जेराव शिंदे सरांचे कार्य प्रेरणादायी उत्कृष्ट आहे कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे त्यांनी शाळेला मिळालेले अनुदान , लोकसहभाग याचा पुरेपूर आणि कल्पकतेने याठिकाणी उपयोग करून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करून शाळा घडवली आहे.शाळेची गुणवत्ता शिंदे सर व सोनार मॅडम यांनी निश्चितपणे वाढवली आहे. शाळेची रंगरंगोटी ,सोलर सिस्टिम, मल्लखांब, चाइल्ड फ्रेंडली हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे असे त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. माननीय श्री नकाते साहेब, शंकर गोडसे सर , श्री कलाप्पा मुंजे, गोडसे गुरुजी यांनी शाळेच्या कार्याचे व गुणवत्तेचे आपल्या मनोगतातून कौतुक केले
शेवटी शेख सर यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक पालक या सर्वांचे गोडसेवस्ती शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार मानले तसेच या कार्यक्रमासाठी गाटे सर, जमादार सर ,शेख सर, धांडोरे सर ,कुंभार सर यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार तसेच शिक्षण परिषदेच औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समितीने स्नेह भोजनाचे आयोजन केले होते .अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे विशेष म्हणजे शाळेकडे येण्यासाठी माळशिरस तालुक्यातील शेवटचे टोक असलेले व सांगली जिल्ह्याला लागून असलेले शिंगोर्णी हे गाव या गावांतर्गत गोडसेवस्ती शाळेत येण्यासाठी रस्ता व्यवस्थित नाही परंतु अशा स्थितीत सुद्धा रस्ता शोधत आपल्या पंचायत समितीचे आदर्श गटशिक्षणाधिकारी देशमुख साहेब, नकाते साहेब, सचिन पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहिले आणि शाळेचे प्रगती व कौतुक ऐकून गोडसेवस्तीवरील पालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.