रयत शैक्षणिक संकुलात पदवी प्रदान सोहळा होणार…!
सातारा / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ परिपत्रकानुसार रयत शिक्षण संकुलातील सर्व महाविद्यालयांचा २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठ पदवी प्रदान सोहळ्यास समक्ष पदवी स्वीकारण्यासंबंधी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित पदवी प्रदान सोहळा गुरुवार दिनांक ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता यशवंतराव चव्हाण इंन्सटीट्युट ऑफ सायन्स सातारा येथील कर्मवीर सभागृहात होणार आहे .या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व भारती विद्यापीठ पुणेचे मा.कुलगुरू तसेच रसायनशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले विभाग प्रमुख मा.प्राध्यापक डॉ .एस .एफ .पाटील हे उपस्थित राहणार आहेत .तसेच या समारंभास शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व अधिसभेचे सदस्य व मिरज महाविद्यालय मिरजचे .प्राचार्य डॉ.सी.टी .कारंडे हे व राजाराम कॉलेज कोल्हापूर येथील प्राचार्य डॉ .ए .एस .खेमनार हे उपस्थित राहणार आहेत .या समारंभाचे अध्यक्ष,म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ .अनिल पाटील हे उपस्थित राहणार आहेत .रयत शिक्षण संस्थेची तीन स्वायत्त महाविद्यालयेव ७ सलग्न महाविद्यालये अशी मिळून १० महाविद्यालये सहभागी होत आहेत. छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ .भाऊसाहेब कराळे ,डी.पी.भोसले कॉलेज कोरेगावचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ .व्ही.एस .सावंत ,सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे ऑडीटर प्रचार डॉ .ए.डी आंधळे ,यशवंतराव चव्हाण इनशट्युट ऑफ सायन्स चे प्राचार्य डॉ .के.जी .कानडे ,डी.जी .कॉलेज ऑफ कॉमर्स च्या प्राचार्य डॉ .प्रतिभा गायकवाड ,आझाद कॉलेजच्या प्राचार्य डॉ .वंदना नलावडे ,इस्माईल साहेब मुल्ला लो कॉलेजचे प्राचार्य डॉ.सौ सुजाता पवार ,के.बी.पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा चे प्राचार्य डॉ .ए .सी आतार ,के.बी.पी .इन्स्ती .ऑफ मनेजमेंट सातारचे डायरेक्टर डॉ.बी.एस .सावंत ,आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ .एस .एम .भोसले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत ,यासी संबंधित ज्या विद्यार्थ्यांनी पदवी स्वीकारण्यासाठी अर्ज केलेत त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व आयोजकांनी कळविले आहे .
प्रसिद्धी विभाग –प्रा.डॉ .सुभाष वाघमारे
छत्रपती शिवाजी कॉलेज ,सातारा